घटस्थापनेला घटस्फोट! नारायण राणेंनी दिला कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 03:41 PM2017-09-21T15:41:27+5:302017-09-21T16:48:50+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून नारायण राणे काय करणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. ते लवकरच कॉंग्रेसपक्षातून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात होतं. आज अखेर कुडाळमध्ये त्यांनी कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Divorce divorce! Narayan Ranee gave Congress and MLA resignation, Congress attacked | घटस्थापनेला घटस्फोट! नारायण राणेंनी दिला कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा

घटस्थापनेला घटस्फोट! नारायण राणेंनी दिला कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा

Next

सिंधुदुर्ग, दि. 21 - नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत  बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार, असे नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले होते. त्यामुळे आज (गुरुवारी) राणे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी पक्षाला रामराम ठोकत कॉंग्रेससोबत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवलं आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला असं राणे म्हणाले. 
नारायण राणेंच्या भाषणातील मुद्दे - 

तुम्ही काय मला काढणार मीच कॉंग्रेस सोडतो

संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा  करून पुढील निर्णय घेणार, नागपूरपासून माझ्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे 

शिवसेनेचे जवळपास 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

 काँग्रेसचं महाराष्ट्रातलं दुकान बंद होणार

 नितेश राणेंच काय काँग्रेस आणि शिवसेनेतीलही अनेक आमदार राजीनामा देतील 

 भाजपपुढे नाक घासतात, उद्धव ठाकरेंना नाकच नाही राहिलं

 दसऱ्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन मी माझी पुढची रुपरेषा स्पष्ट करेन

 नितेश राणेंबाबत योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ

महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नाही

सर्वात वरिष्ठ असूनही गटनेतेपद दिलं नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी रणपिसेंना गटनेता केलं

48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं

12 वर्षे काँग्रेसनं माझा उपयोग करुन घेतला 

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस सोडतील 

शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष रिकामे करणार

 महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो

आम्हाला सहा महिने द्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असं अहमद पटेल मला सुरुवातीला म्हणाले होते

अहमद पटेल म्हणाले, सहा महिने द्या मुख्यमंत्री करु

अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली 

काँग्रेसमध्ये माझ्याशी कसे वागले त्यांच्याबाबत मी आज सांगणार आहे

26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मुंबईत महसूल मंत्री म्हणून फिरलो

विलासराव देशमुखांविरुद्ध मॅडमला जे सांगायला सांगितलं ते बोललो. अहमद पटेल म्हणाले थोड्या दिवसात शपथविधी होईल, पण झाला नाही

 मला मँडमनं दोनदा सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार 

तीन वेळा मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं

 मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन काँग्रेसनं पाळलं नाही

महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो

4 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली

 

 

Web Title: Divorce divorce! Narayan Ranee gave Congress and MLA resignation, Congress attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.