दिवाळीची आतषबाजी बेतली पशू-पक्ष्यांच्या जिवावर, फटाक्यांचा कचरा उघड्यावर टाकू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:54 AM2017-10-23T01:54:53+5:302017-10-23T01:55:01+5:30

दिवाळीमध्ये लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत फटाक्यांचे आकर्षण कमालीचे असते. फटाक्याने काही क्षणांचा आनंद अनुभवायला मिळतो, पण निसर्गाची हानी दीर्घकाळ होते. याकडे कोणी लक्ष देत नाही.

Diwali fireworks do not let loose the cracks of wild animals and birds | दिवाळीची आतषबाजी बेतली पशू-पक्ष्यांच्या जिवावर, फटाक्यांचा कचरा उघड्यावर टाकू नका

दिवाळीची आतषबाजी बेतली पशू-पक्ष्यांच्या जिवावर, फटाक्यांचा कचरा उघड्यावर टाकू नका

Next

सागर नेवरेकर 
मुंबई : दिवाळीमध्ये लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत फटाक्यांचे आकर्षण कमालीचे असते. फटाक्याने काही क्षणांचा आनंद अनुभवायला मिळतो, पण निसर्गाची हानी दीर्घकाळ होते. याकडे कोणी लक्ष देत नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंंबईकरांचा फटक्यांबाबतचा उत्साह प्राण्यांसह पक्ष्यांच्या जिवावर बेतला असून फटाक्यांमुळे प्राण्यांसह पक्ष्यांना इजा पोहोचली आहे.
मुलुंड येथील वीणानगर परिसरात फटाक्यांच्या आवाजामुळे घरट्याबाहेर पडलेली बुलबुल पक्ष्यांची पिल्ले आढळली. सोसायटीच्या आवारातील झाडाझुडपात बुलबुल पक्षाने घरटे बांधले होते. सोसायटीतील लहान मुलांनी फटाके फोडायला सुरुवात केली असता बुलबुल पक्ष्यांची पिल्ले फटाक्याच्या आवाजाने बाहेर आली. या पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी प्राणिमित्रांना बोलावण्यात आले. त्यानंतर पिल्लांना घरट्यात सोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु प्रयत्न निष्फळ ठरले. तर चेंबूर येथील रोड नंबर ४ वरील सत्यलक्ष्मी सोसायटीमध्ये एक पाय तुटलेली पानकोंबडी आढळली. त्या पानकोंबडीवर त्वरित उपचार करण्यासाठी ठाण्यातील एसपीसीए येथे नेण्यात आले.
पवईतभटक्या कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यामुळे जखम झाली. मुलुंडमध्ये लिंक रोडला अर्धे तोंड जळालेला कुत्रा रस्त्यातून सैरावैरा पळत असल्याचे कळवण्यात आले. परंतु जखमी कुत्रा कोणाच्या दिसण्यात आला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. प्राण्यांना इजा होते, त्या वेळी ते प्रचंड घाबरलेले असतात. घाबरलेल्या स्थितीत असल्याने कोणाच्या हातात सापडत नाहीत, अशी माहिती प्राणिप्रेमींनी दिली. मुलुंडमधील राहुलनगर येथे जखमी अवस्थेत माकड सापडले. उपचारानंतर दोन दिवसांनी माकडाचा मृत्यू झाला, अशी माहिती रॉ पशू संस्थेचे पशुकल्याण अधिकारी आणि वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली.
भांडुपमधून जखमी चिमणी आढळली. लहान मुलांनी चिमणीच्या घरट्यांत फटाका फोडल्याने चिमणीला इजा झाली. तसेच मुलुंडमध्ये घुबड आढळला. घुबडदेखील फटाक्यांच्या आवाजाने घाबरून गेले होते. चिमणी आणि घुबडावर उपचार करून सुटका करण्यात आली.
>दिवाळी संपल्यावर काही लोक फटाक्यांचा कचरा उघड्यावर टाकून देतात. उघड्यावर टाकून दिलेले फटाके कुत्रे आणि मांजर यासारखे प्राणी चाटतात. त्या फटाक्यांतील विषारी पदार्थ प्राण्यांच्या पोटात गेल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर फटाके किंवा फटाक्यांचा कचरा टाकू नये, असे आवाहन प्राणिमित्रांनी केले आहे.
>परळ येथे असणाºया पशुवैद्यकीय रुग्णालयात फटाक्यांमुळे जखमी झालेल्या प्राणी आणि पक्ष्यांना मोठ्या संख्येने दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली़
>मुंबईत आढळलेले जखमी प्राणी, पक्षी
>पवईमध्ये प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेला पाळीव कुत्रा आढळला आहे. हा कुत्रा काळ्या रंगाचा असून त्याच्या कंबरेत निळ्या रंगाचा पट्टा आहे, अशी माहिती सोसायटीचे सचिव सुनिश कुंजू यांनी दिली.
१७ आॅक्टोबर
सरपटणारे प्राणी - ०८
पक्षी - ००
सस्तन प्राणी - ०१
एकूण - ०९
१८ आॅक्टोबर
सरपटणारे प्राणी - ०३
पक्षी - ०१
सस्तन प्राणी - ००
एकूण - ०४
१९ आॅक्टोबर
सरपटणारे प्राणी - ०४
पक्षी - ०२
सस्तन प्राणी - ००
एकूण - ०६
२० आॅक्टोबर
सरपटणारे प्राणी - ०४
पक्षी - ००
सस्तन प्राणी - ००
एकूण - ०४

Web Title: Diwali fireworks do not let loose the cracks of wild animals and birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.