ओखी चक्रीवादळाचा धोका, 4 आणि 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 06:32 PM2017-12-02T18:32:14+5:302017-12-02T18:32:30+5:30

अरबी समुद्रात ओखी नावाचे वादळ तयार झाले असून, ते सध्या मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1000 कि.मी वर स्थित आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल.

Due to the risk of untied hurricane, fishermen should not go to sea on December 4 and 5 | ओखी चक्रीवादळाचा धोका, 4 आणि 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये!

ओखी चक्रीवादळाचा धोका, 4 आणि 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये!

Next

मुंबई - अरबी समुद्रात ओखी नावाचे वादळ तयार झाले असून, ते सध्या मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1000 कि.मी वर स्थित आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सागरी किनार्‍यांवरील समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी मासेमारांनी सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे.

मुंबईसह सागरी किनार्‍यांवर 4 तारखेला अंशत: तसेच 5 तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते. 5 तारखेला मुंबई, कोकणात सागरी भागात वार्‍यांची तीव्रता अधिक असेल. त्याहीदृष्टीने नागरिकांनी सतर्क असावे. यामुळे किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होईल.
 

Web Title: Due to the risk of untied hurricane, fishermen should not go to sea on December 4 and 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.