आत्मक्लेश यात्रेदरम्यान राजू शेट्टींच्या मुलाला भोवळ

By Admin | Published: May 29, 2017 01:56 PM2017-05-29T13:56:52+5:302017-05-29T13:56:52+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेदरम्यान त्यांचा मुलगा चक्कर येऊन कोसळला. उष्णता आणि अशक्तपणामुळे त्याला चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे.

During the self-pilgrimage yatra, the son of Raju Shetty | आत्मक्लेश यात्रेदरम्यान राजू शेट्टींच्या मुलाला भोवळ

आत्मक्लेश यात्रेदरम्यान राजू शेट्टींच्या मुलाला भोवळ

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेदरम्यान त्यांचा मुलगा चक्कर येऊन कोसळला. राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टीला  उष्णता आणि अशक्तपणामुळे चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे. मांटुग्यातील फाईव्ह गार्डन परिसरा त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
 
मुलाला त्रास झाला असला तरी ही आत्मक्लेश यात्रा थांबवण्यात येणार नसल्याचं शेट्टींनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी राजू शेट्टी यांनाही यात्रेदरम्यान त्रास झाला होता. डॉक्टरांनी त्यांना यात्रा थांबवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आत्मक्लेश यात्रा थांबवणार नाही, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले होते. 

(राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेमुळे वाहतूक कोंडी, मुंबईकरांना "क्लेश")
दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा आज मुंबईत दाखल झाली. या यात्रेमुळे  पनवेल-सायन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडीमुळे मानखुर्दपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य मुंबईकर हैराण झाले होते. 
 

 

आत्मक्लेश यात्रेनिमित्त नवी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही यांना साथ दिली. गावा-गावांमध्ये जाऊन मते मागितली, पण आता त्याचा पश्चात्ताप होत आहे. केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आत्मक्लेश यात्रा काढली आहे. भाजपा सरकारने तीन वर्षांमध्ये फक्त भाषणे व आश्वासने दिली. मोदी शेतकऱ्यांचे भले करतील, असे वाटले होते, परंतु त्यांच्या सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागत आहे. मोदींना शेतीविषयी काही कळत नाही किंवा कळत असून, जाणीवपूर्वक ते शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची खात्री वाटू लागली आहे. यांच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट झाले. आत्महत्यांची संख्या वाढली असल्याची टीकाही त्यांनी केली.

भांडवलदारांना कर्जमुक्ती दिली जात आहे, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास विरोध दर्शविला जात आहे. बँकांची कर्र्जे थकविणाऱ्या उद्योजकांची नावे जाहीर केली जात नाहीत, पण वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरांचा जाहीर लिलाव केला जात आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर सरकारचे पाय ओढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला आहे.

 

 

Web Title: During the self-pilgrimage yatra, the son of Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.