आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द – शिक्षणाधिकारी मीना यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 03:10 PM2018-03-23T15:10:48+5:302018-03-23T15:10:48+5:30

राज्यात तसेच जिल्हामध्ये सध्या आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु असून काही शाळा बालकांना प्रवेश देण्यास आडकाठी करत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले असून, प्रवेश देण्यास मनमानी करणाऱ्या शाळांच्या शाळा मान्यता काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी एका बैठकी दरम्यान दिली.

Education Minister Meena Yadav will not accept school admission rejecting RTE admission | आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द – शिक्षणाधिकारी मीना यादव

आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द – शिक्षणाधिकारी मीना यादव

Next

ठाणे : राज्यात तसेच जिल्हामध्ये सध्या आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु असून काही शाळा बालकांना प्रवेश देण्यास आडकाठी करत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले असून, प्रवेश देण्यास मनमानी करणाऱ्या शाळांच्या शाळा मान्यता काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी एका बैठकी दरम्यान दिली.

आरटीई 25 टक्के अधिसुचना नुसार शाळेचे मुख्याध्यापक हे शाळा रजिस्ट्रेशन साठी पूर्णत: जबाबदार आहेत. पालकांनी पाल्यांचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सोडत पध्दतीने ज्या बालंकाचे प्रवेश शाळांमध्ये झालेले आहेत त्या संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी  बालकांना प्रवेश देणे अधिसूचनेनुसार बंधनकारक आहे. प्रवेशाची अंतिम दिनांक 24 मार्च 2018 असल्याने तात्काळ कार्यवाही करुन बालकाचे प्रवेश होतील यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश  शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना दिले आहेत.
 *शाळांना कोणत्याही प्रकराचे शुल्क आकारता येणार नाही

शाळांना कोणत्याही विदयार्थ्यांकडुन प्रवेश नोंदणी शुल्क, माहिती पुस्तिका शुल्क, शिक्षण शुल्क अथवा कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा निधी पालंकाकडुन किंवा विदयार्थ्यांकडुन प्रवेश घेताना आकारता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

Web Title: Education Minister Meena Yadav will not accept school admission rejecting RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.