उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि फ्रान्स दूतावास यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:54 PM2018-01-13T23:54:09+5:302018-01-13T23:54:19+5:30
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि फ्रान्स दूतावास यांच्यात शनिवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये महाराष्ट्रातील जवळपास १५ विद्यार्थ्यांना फ्रान्स दूतावासांचे सहकार्य लाभणार आहे. नऊ महिन्याच्या कालावधीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे फ्रान्सला विद्यार्थी पाठवणार असून या त्यांना ५५,६00 रुपये मासिक विद्यावेतन फ्रान्स दूतावासातर्फे देण्यात येईल.
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि फ्रान्स दूतावास यांच्यात शनिवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये महाराष्ट्रातील जवळपास १५ विद्यार्थ्यांना फ्रान्स दूतावासांचे सहकार्य लाभणार आहे. नऊ महिन्याच्या कालावधीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे फ्रान्सला विद्यार्थी पाठवणार असून या त्यांना ५५,६00 रुपये मासिक विद्यावेतन फ्रान्स दूतावासातर्फे देण्यात येईल.
महाराष्ट्र शासन आणि फ्रान्स दूतावास यांच्यातील हा पहिला शैक्षणिक सामंजस्य करार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, डेप्युटी कॉउन्सेलर सहकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग अरुणा अदिसियाम आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे सह सचिव सिद्धार्थ खरात आणि अरुणा अदिसियाम डेप्युटी कॉउन्सेलर सहकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांनी करारावर स्वाक्षºया केल्या.
या कराराच्या माध्यमातून निवडक आठ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी फ्रान्स दूतावासामार्फत पुढाकार घेतला जाणार असून विभागामार्फत राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकांना याबद्दल माहिती दिली जाणार आहे.
या करारान्वये फ्रान्सच्या भाषा आणि समाजांबद्दल त्यांचे भाषा कौशल्य आणि त्यांच्या स्वत:च्या संस्कृतीचे मौल्यवान ज्ञान फ्रेंच शाळांबाबत जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे हा असणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि फ्रान्स यांच्यामधील रोजगाराला प्रोत्साहन मिळू शकेल. या करारामुळे महाराष्ट्रातील ७ ते १५ विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात अभ्यासाची दालने निर्माण करुन विविध कार्यशाळाच्या माध्यमातून हे सहजरित्या साधता येणार असून दोन्ही देशात एक सांस्कृतिक देवाण-घेवाण याचे एक मोठे दालन यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात होईल.
- विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री