'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 07:42 PM2019-10-23T19:42:16+5:302019-10-23T19:54:17+5:30

उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजय कोणाचाही होवो जल्लोष करू नये

Emotional appeal of BJP candidate of kopargaon to honor of martyr by snehalata kolhe | 'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन

'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन

googlenewsNext

मुंबई/अहमदनगर - कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांनी निकालानंतर विजयी जल्लोष न करण्याचे आवाहन केलं आहे. आपल्या कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील वीर जवान नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे यांना मंगळवारी वीरगती प्राप्त झाली. आपण आपल्या तालुक्यातील एक भूमिपुत्र गमावला असून या दुःखात आपण सर्व जण भावुक झालो आहोत, असे म्हणत निकाल काहीही लागो, विजयाचे सेलिब्रेशन नको, असा निर्णय स्नेहलात कोल्हेंनी घेतला आहे. 

भूमिपुत्राच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. त्यामुळे उद्या विधानसभा निवडणुकीचाk निकाल जाहीर झाल्यावर विजय कोणाचाही होवो जल्लोष करू नये, गुलाल उधळण करू नये. या दुःखासमोर कितीही मोठा आनंद असला तरी तो क्षुल्लक आहे. त्यामुळे सर्वांनी या दुःखाची जाणीव ठेवावी आणि उद्या आपल्यातील संवेदनशीलता जपावी, असे आवाहन करत भाजपा उमेदवार स्नेहलता कोल्हेंनी निकालानंतरचा जल्लोष किंवा सभा न घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. स्नेहलता कोल्हे या कोपरगाव मतदारसंघातील विद्यमान आमदार असून त्यांनी भाजपा महायुतीकडून निवडणूक लढवली आहे. स्नेहलता यांना राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांचे आव्हान आहे. कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील रहिवासी नायब सुभेदार सुनिल रावसाहेब वलटे (वय 40) यांना मंगळवारी सीमेवर वीरमरण आले आहे. याशहीद वटे यांच्यावरती शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे तहसिलदार यांनी सांगितले आहे. 

मराठा इंफन्ट्री रेजिमेंट 24 बटालियन मंगळवारी (दि.22) जम्मू येथील नौशेरा सीमेवर अतिरेक्यांवर कारवाई करत असताना सुभेदार सुनील रावसाहेब वलटे यांना वीरमरण आले आहे. शहीद सुनिल वलटे यांच्यामागे त्यांची पत्नी मंगल वलटे, मुलगी श्रध्दा (वय 14), मुलगा वेदांत (वय 6), वडील रावसाहेब, आई सुशिला, भाऊ अनिल असा परिवार आहे. सुभेदार सुनील वटे यांच्या वृत्ताने कोपरगाव तालुक्यातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे. 


 

Web Title: Emotional appeal of BJP candidate of kopargaon to honor of martyr by snehalata kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.