राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, सिद्धिविनायकाच्या आरतीला लाभली प्रसिद्ध ड्रमर शिवमणी यांची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 08:04 AM2017-08-25T08:04:27+5:302017-08-25T08:14:19+5:30

ढोलताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेले आहे. संपूर्ण राज्यभरात गणपतीचाच जयजयकार सुरू आहे. आता पुढील 12 दिवस गणरायाचेच अधिराज्य दिसणार असून सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

The enthusiasm of Ganeshotsav across the state, along with the famous pioneer drummer Shivamani | राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, सिद्धिविनायकाच्या आरतीला लाभली प्रसिद्ध ड्रमर शिवमणी यांची साथ

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, सिद्धिविनायकाच्या आरतीला लाभली प्रसिद्ध ड्रमर शिवमणी यांची साथ

Next

मुंबई, दि. 25 - ढोलताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेले आहे. संपूर्ण राज्यभरात गणपतीचाच जयजयकार सुरू आहे. आता पुढील 12 दिवस गणरायाचेच अधिराज्य दिसणार असून सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.घरघरांत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जल्लोषात बाप्पांचं स्वागत करण्यात येत आहे. ढोल-ताशे, गुलाल, फुलांच्या उधळणीमध्ये बाप्पा घरोघरी आणले जात आहेत. मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेश गल्लीचा राजा आणि नवसाला पावणाराअशी ख्याती असलेल्या सिद्धिविनायकची प्राणप्रतिष्ठा पहाटेच करण्यात आली. बाप्पांची पहिली आरतीही संपन्न झाली.

सिद्धिविनायकाच्या आरतीला शिवमणी
तर दुसरीकडे गणेशचतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाची गणेशोत्सवातली पहिली आरतीदेखील झालेली आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी केली होती. विशेष म्हणजे सिद्धिविनायकाच्या आरतीला साथ लाभली ती वाद्यांचा बादशाह असलेल्या शिवमणी यांची. शिवमणी यांनी यावेळी वाद्य वाजवून सिद्धिविनायकाची आरती केली. सिद्धिविनायक मंदिरात आज गणेशचतुर्थीनिमित्त विशेष तयारी करण्यात आली आहे. मंदिराच्या कळसासह संपूर्ण मंदिराची सजावट करण्यात आली आहे. मंदिराचा गाभाराही  फुलांनी सजवण्यात आला आहे.


पुढच्या वर्षी
बाप्पा १९ दिवस उशिराने येणार
यंदा गणेश चतुर्थी शुक्रवार २५ आॅगस्ट रोजी आली आहे. परंतु पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिराने गुरुवार १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. गणेशभक्तांच्या माहितीकरिता त्यांनी पुढील २१ वर्षांतील गणेश चतुर्थीचे दिवस आणि कोणत्या वर्षी कोणता अधिक महिना येणार आहे, त्याची माहितीही दिली.




दुकानांसह बाजारांत गर्दी
बाप्पाची हौस पुरवण्यासाठी मिठाईच्या दुकानांपासून फुल मार्केटमध्ये भक्तांनी गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठांवरही बाप्पाचेच राज्य दिसले. झेंडूच्या फुलांपासून मोदकांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. जीएसटीमध्ये ठप्प पडलेले बाजारही बाप्पाच्या आगमनाने फुलल्याचे व्यापारी संघटनांनी सांगितले.

ध्वनिप्रदूषणासाठी तक्रार निवारण कक्ष
ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रणाकरिता सर्व पोलीस ठाणेनिहाय नेमणूक करण्यात आलेल्या पदनिर्देशित अधिकाºयांची यादी तसेच माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सण / उत्सवादरम्यान रस्ते, पदपथांवरील मंडपांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष अधिकाºयांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ध्वनिप्रदूषण व अनधिकृत मंडपांबाबतच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक १२९२ व १२९३ वर नोंदविता येतील.

कोणत्या वर्षी कधी येणार बाप्पा?
- गुरुवार, १३ सप्टेंबर २०१८ (ज्येष्ठ अधिकमास)
- सोमवार, २ सप्टेंबर २०१९
- शनिवार, २२ आॅगस्ट २०२० (आश्विन अधिकमास)
- शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१
- बुधवार, ३१ आॅगस्ट २०२२
- मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ (श्रावण अधिकमास)
- शनिवार, ७ सप्टेंबर २०२४
- बुधवार, २७ आॅगस्ट २०२५
- सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ (ज्येष्ठ अधिकमास)
- शनिवार, ४ सप्टेंबर २०२७
- बुधवार, २३ आॅगस्ट २०२८,
- मंगळवार, ११ सप्टेंबर २०२९ (चैत्र अधिकमास)
- रविवार, १ सप्टेंबर २०३०
- शनिवार, २० सप्टेंबर २०३१ (भाद्रपद अधिकमास)
- बुधवार, ८ सप्टेंबर २०३२
- रविवार, २८ आॅगस्ट २०३३,
- शनिवार, १६ सप्टेंबर
२०३४ (आषाढ अधिकमास)
- बुधवार, ५ सप्टेंबर २०३५
- रविवार, २४ आॅगस्ट
२०३६
- शनिवार, १२ सप्टेंबर
२०३७ (ज्येष्ठ अधिकमास)
- गुरुवार, २ सप्टेंबर २०३८

Web Title: The enthusiasm of Ganeshotsav across the state, along with the famous pioneer drummer Shivamani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.