Exclusive: खालच्या पातळीवर टीका झाल्यास मातोश्रीला सडेतोड प्रत्युत्तर देणारः नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 07:39 PM2019-03-20T19:39:33+5:302019-03-30T13:46:22+5:30
आमच्या दोन्ही मुलांना आम्ही बाळासाहेबांचा फोटो दाखवून त्यांच्यामुळेच राणे कुटुंबीय उभे असल्याची जाणीव करून देतो.
मुंबई : नारायण राणे यांच्यावर खालच्या पातळीवर अपशब्दांत टीका झाल्यास मातोश्रीला सडेतोड उत्तर देणार असल्याचा इशारा नितेश राणे यांनी दिला.
स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली. यावेळी नितेश राणे यांनी नारायण राणे यांची लोकसभेसाठीची भुमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रात, कोकणात जे गाजतय की दोन्ही पुत्रांनी ठाकरे कुटुंबावर टीका सुरु केली आहे, मातोश्रीवर थेट टीका करत असल्याचा नकारात्मक परिणाम होईल असे तुम्हाला वाटते का, असे विचारले असता नितेश राणे यांनी राणे नेते असण्यापूर्वी आमचे वडील असल्याचे सांगितले. अपशब्दात त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जाते. टीका काय लायकीचा नेता करतो हे महत्वाचे आहे. काही लोकांना त्यांच्या राजकीय उंचीमुळे कदाचीत टीका करण्याचे अधिकार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे हे एकमेकांवर टीका करू शकतात. त्यांच्या पातळीवर ते करू शकतात. पण कोणीही उठून टीका करेल, काहीही टीका करेल हे बघितले पाहिजे. मी असेन किंवा निलेश असेल, कोणावर किती टोकाची टीका केली ते पाहा. राणेंवर कोणत्या पातळीवर टीका होते ती जनतेला दाखविल्यास प्रत्येक मुलगा सांगेल की आम्ही टीका केली ती योग्य आहे, अशा शब्दांत त्यांनी मातोश्रीवरच्या निलेश राणे यांच्या आरोपांची पाठराखण केली.
वडीलांवर खालच्या स्तरावर टीका केली तर राजकारण त्याच्या पातळीवर योग्य आहे, तर मुलगा म्हणून आम्हीही राजकीय पातळी सोडण्यास तयार असल्याचा इशार त्यांनी दिला. या टीकेला प्रत्युत्तर देणे मुलगा म्हणून आमचे कर्तव्य असल्याचे नितेश राणे म्हणाले. कधीही बाळासाहेबांवर राणेंनी किंवा आम्ही टीका केलेली नाही. आमच्या दोन्ही मुलांना आम्ही बाळासाहेबांचा फोटो दाखवून त्यांच्यामुळेच राणे कुटुंबीय उभे असल्याची जाणीव करून देतो. ही कोकणची संस्कृती आहे. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, मरेपर्यंत राहील आणि पुढच्या पिढीलाही त्यांचा आदर करण्याचे शिकवून जाऊ, असेही नितेश राणे यांनी सांगितले. मात्र, डिवचल्यास मातोश्रीवर टीका सुरुच राहील असेही त्यांनी सांगितले.
Exclusive : नितेश राणे यांनी सांगितले 2014 मधील पराजयाचे कारण
नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा
Exclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम'