Exclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:30 PM2019-03-20T18:30:21+5:302019-03-30T13:48:46+5:30
स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली.
मुंबई : काँग्रेसमधून नारायण राणे बाहेर पडले, परंतू त्यांना भाजपने झुलवत ठेवत नवा पक्ष काढायला लावला. अशाप्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राणे परिवाराचा गेम केल्याचे राज्यात बोलले जात आहे. हे आरोप नितेश राणे यांनी फेटाळून लावले असून नारायण राणे कोणाला गेम करू देतील का? आम्ही सकारात्मक राजकारण करत आहोत असे उत्तर त्यांनी दिले.
स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली. यावेळी नितेश राणे यांनी नारायण राणे यांची लोकसभेसाठीची भुमिका स्पष्ट केली.
काँग्रेसमध्ये राणेंवर काय अन्याय झाला हे तुम्हीही सांगता आणि जनतेलाही माहिती आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने यांनी राणे परिवाराचा गेम केला असे वाटते का? असा प्रश्न विचारला असता नितेश राणे यांनी हे सत्य नसल्याचे सांगितले. राजकारणात युटर्न, बॅडपॅच येतात. असा एकही राजकीय व्यक्ती नाही. त्यामुळे कोणी गेम करू पाहत असेल तर राणे स्वत:चा गेम करू देतील का, हे ही पाहणे महत्वाचे आहे, सकारात्मक दिशेने वाटचाल सुरु आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले.
नारायण राणेंना कोकणातील लोकांचा पाठिंबा
कोकणात राणे परिवाराला होत असलेला विरोध पाहता राणेंची कार्यपद्धती, आक्रमकता यावर कधी तुमची चर्चा होते का, असा सवाल केला असता त्यांनी 2014 ची निवडणूक अपवाद होती असले सांगितले. राणेंनी जनतेच्या पाठिंब्यावर सर्व पदे भूषविली. निलेश राणे खासदार, मी आमदार झालो. हे राणेंची आक्रमकता आवडल्यानेच त्याच कोकणातील जनतेने प्रेम दिले. 2014 मध्ये आमच्याबाबत संभ्रम आणि चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली, असे स्पष्टीकरण देताना त्यांनी राणे समर्थकांनी केलेल्या चुकांवरही गंभीर भाष्य केले.
नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा