भटक्या विमुक्त जमाती, मागासवर्ग शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:33 PM2018-12-26T13:33:44+5:302018-12-26T13:35:16+5:30
सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपणास लागू असलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावरुन तत्काळ अर्ज भरावेत.
पुणे: भटक्या विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग विभागातर्फे शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास येत्या सोमवारपर्यंत (दि. ३१) मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपणास लागू असलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावरुन तत्काळ अर्ज भरावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे पुणे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागातर्फे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. ँ३३स्र://ेंँुंि३ेंँं्र३.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळ माहिती उपलब्ध आहे. समाजकल्याण विभागामार्फत विविध समाज घटकांच्या शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी/विद्यावेतन, निर्वाह भत्ता वितरीक करावयाच्या योजनांचा समावेश या स्थळांमध्ये करण्यात आला आहे.