बनावट सेंद्रीय शेती उत्पादनांचा बाजारात सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 11:51 AM2019-10-11T11:51:01+5:302019-10-11T11:55:48+5:30

राज्यात सध्या एकूण शेतीपैकी ७ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते़. ..

fake organic farming products more sales in market | बनावट सेंद्रीय शेती उत्पादनांचा बाजारात सुळसुळाट

बनावट सेंद्रीय शेती उत्पादनांचा बाजारात सुळसुळाट

Next
ठळक मुद्देसेंद्रिय उत्पादनांच्या विश्वासार्हतेकरिता शासनस्तरावर हालचालीबनावट सेंद्रिय शेती उत्पादनांना आळा घालण्याकरिता कायदा लवकरच  सेंद्रिय शेतीत महाराष्ट्र आघाडीवर पण प्रमाणिकराअभावी आंतरराष्ट्रीय बाजार कमी 

- नीलेश राऊत 
पुणे : सेंद्रिय शेतीचे महत्व व या सेंद्रिय उत्पादनांची लोकप्रियता लक्षात घेता, शासनस्तरावरून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे़. यातून सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसारही होत आहे़. परंतू दुसरीकडे बाजारात बनावट सेंद्रिय शेती उत्पादनांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे़. केवळ ‘सेंद्रिय उत्पादन लेबल’ लावून, आहे तोच माल चढ्या किंमतीने विकून ग्राहकांची राजरोसपणे फसवणुक सुरू असल्याने सेंद्रिय शेती उत्पादनांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे़. 
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या एकूण शेतीपैकी ७ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते़. यामध्ये परंपरागत रसायनांचा वापर न करणारे डोंगराळ व आदिवासी क्षेत्र यांचाही समावेश आहे़. यापैकी ३ लाख ३८ हजार ११७ हेक्टर क्षेत्रावर राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेती (पंरपरागत कृषी विकास योजना) विकास योजनेंतर्गत उत्पादन घेणे सुरू आहे़. या सेंद्रीय उत्पादनांना सहभाग हमी पध्दतीने (पीजीएस) प्रमाणिकरण केले जात आहे़. परंतू हे प्रमाणिकरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राह्य धरले जात नाही़. तरअपेडामार्फत मान्यताप्राप्त खाजगी प्रमाणिकरण संस्थांकडून झालेले सेंद्रिय शेती उत्पादनाचे प्रमाणिकरण अधिक विश्वासार्ह असून, या प्रमाणिकरणास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान्यताही आहे़. यामुळे पीजीएसला अधिक सक्षम करणे जरूरी आहे़. दरम्यान राज्य शासनानेही याची दखल घेऊन आता सेंद्रिय शेतीला राज्य शासनाची मोहोर उमटवून अधिक विश्वासार्ह बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़. याकरिता पीजीएस व्यतिरिक्त व अधिक विश्वासार्ह प्रमाणिकरणाकरिता महाराष्ट्र शासनाने सिक्कीम राज्याच्या धर्तीवर सेंद्रिय शेती उत्पादन प्रमाणिकरण यंत्रणा उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत़. 
-----
भारतातून सुमारे साडेतीन हजार कोटी रूपयांची निर्यात 
अपेडाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताने सन २०१८ मध्ये प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांचे अंदाजे १़७० दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन केले आहे़. यामध्ये प्रामुख्याने तेल बियाणे, ऊस, तृणधान्ये, कापूस, कडधान्ये, औषधी वनस्पती, चहा, फळे, मसाले, सुकामेवा, भाजीपाला या सर्व प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे. यामध्ये नियार्तीचे एकूण प्रमाण ८.८८ लाख मेट्रिंक टन होते़ या सेंद्रिय अन्न नियार्तीचे मूल्य हे ३४,३़४८ कोटी रूपये (५१५़४४ दशलक्ष डॉलर्स) इतके आहे़. ही सेंद्रिय उत्पादने अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, न्यूझीलंड, जपान इत्यादी देशांत निर्यात केली गेली़. 
---
 

* सेंद्रिय शेतीत महाराष्ट्र आघाडीवर पण प्रमाणिकराअभावी आंतरराष्ट्रीय बाजार कमी 
देशामध्ये सिक्कीम राज्य हे संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे राज्य असले तरी, सेंद्रीय शेती क्षेत्राची तुलना करता महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे़ मात्र तरीही महाराष्ट्रात पाहिजे तसा सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार झालेला नाही़ किंबहुना या उत्पादनांना मिळणारी पीजीएस प्रमाणिकरण इतर प्रमाणिकराच्या तुलनेत खूपच कमी पडत आहे़ देशात महाराष्ट्रखालोखाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांच्यानंतर मध्य प्रदेश हे सर्वात मोठे सेंद्रिय उत्पादक राज्य आहे. वस्तूंच्या बाबतीत तेल बियाणे ही सर्वात मोठी श्रेणी असून त्यानंतर ऊस, तृणधान्ये, कडधान्ये, औषधी, हर्बल आणि सुगंधी वनस्पती आणि मसाले यांचा समावेश आहे़ 
------------
* बनावट सेंद्रिय शेती उत्पादनांना आळा घालण्याकरिता कायदा लवकरच 
बाजारातील बनावट सेंद्रिय शेती उत्पादनांना आळा घालण्याकरिता शासन गांभिर्याने कार्यवाही करीत असून, या फसवेगिरीला आळा बसविण्याकरिता शासन सेंद्रिय शेतीकरिताचा स्वतंत्र कायदा अंमलात आणणार आहे़ यामुळे शासनाची स्वत:ची नियमावली अस्थित्वात येणार आहे़ तसेच सेंद्रिय शेती विषयक ग्राहकांमध्ये जागृत करून, दर्जेदार व विश्वासार्ह सेंद्रिय शेती उत्पादनांचा पुरवठा करणे यासाठी शासन प्रयत्नशील आहे़ 
 

Web Title: fake organic farming products more sales in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.