जातपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखल, वकिलासह कुटुंबीयांवर घातला बहिष्कार; फिर्याद दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:23 AM2017-09-22T00:23:24+5:302017-09-22T00:24:44+5:30

पद्मशाली पंच कमिटीच्या मालकीच्या जागेमधील भाडेकराराने दिलेल्या जागेची भाडेपावती नावावर करून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागून तसे न केल्यास मिळकतीमधून बेदखल करून समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकण्याची धमकी वकिलासह त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे.

An FIR lodged against Jat Panchayat, boycott of family members including advocates; Sued | जातपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखल, वकिलासह कुटुंबीयांवर घातला बहिष्कार; फिर्याद दाखल

जातपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखल, वकिलासह कुटुंबीयांवर घातला बहिष्कार; फिर्याद दाखल

Next

पुणे : पद्मशाली पंच कमिटीच्या मालकीच्या जागेमधील भाडेकराराने दिलेल्या जागेची भाडेपावती नावावर करून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागून तसे न केल्यास मिळकतीमधून बेदखल करून समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकण्याची धमकी वकिलासह त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. कमिटीच्या पंचांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून सक्तीचे संरक्षण (प्रतिबंध व निवारण) अधिनियम २०१६च्या कलम ३८८ (१५) ५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सोमनाथ केंची (रा. गुरुवार पेठ), महादेव काडगी (धनकवडी), दिलीप जाना (कोंढवा बुद्रुक), विनायक साका (३०१, महात्मा फुले पेठ), विनोद जालगी (धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सचिन नरेंद्र दासा (वय ३७, रा. २९६, काशितारा निवास, महात्मा फुले पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
या जागेत दासा यांचे पणजोबा नारायण चन्नप्पा दासा हे भाडेकरू होते. ही जागा त्यांच्या मृत्यूनंतर आजोबा काशिनाथ नारायण दासा यांच्या ताब्यात आली. काशिनाथ यांनी जागेची भाडेपावती वडील नरेंद्र यांच्या नावाने करण्यासाठी संस्थेला लेखी अर्ज दिले होते. काशिनाथ यांच्या मृत्यूनंतर भाडेपावती नरेंद्र यांच्या नावे केली नाही. त्याचे भाडेही दासा कुटुंबीय देत आहेत. वडील नरेंद्र यांच्या मृत्यूनंतर भाडे पावती स्वत:च्या नावाने करण्यासाठी सचिन यांनी अर्ज दिले. पदाधिकाºयांकडे विचारणा केली असता विद्यमान सरपंच सोमनाथ केंद्री यांनी भाडे पावती नावावर करण्यासाठी पाच लाख रुपये तसेच भाड्याचे १५ हजार वेगळे द्यावे लागतील, असे सांगितले. समजाबाहेरील सदस्यांनाही भाडेकरू म्हणून ठेवल्याचे व त्यांना भाडेपावती दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. २०१६मध्ये कमिटी आणि दासा कुटुंबीयांची बैठक झाली. त्याही वेळी पैशांची मागणी करण्यात आली. ७ एप्रिल २०१७ रोजी अ‍ॅड. आनंद दासा यांनी केंची यांना फोन केला असता त्यांना शिवीगाळ केली. याबाबत मीठ गंज पोलीस चौकीमध्ये तक्रार केल्यावर केंची यांना समज देऊन प्रकरण मिटवले होते. २६ एप्रिल रोजी संस्थेने घेतलेल्या बैठकीमध्ये आनंद यांना दिलीप जाना यांनी ‘तुम्हाला माज आला आहे. आताच जागा रिकामी करायला लावतो,’ असे म्हणून विश्वस्त काडगी यांना फोन केला. काडगी यांनीही त्यांना ‘तुमच्या बापाने आणि आजोबांनी समाजात खूप नाटके केली आहेत. आम्ही सांगितलेली रक्कम द्या, नाहीतर तुम्हाला मिळकतीमधून बेदखल करून समजातून वाळीत टाकू. दासा कुटुंबातील एकाच्या जिवाचे तरी बरेवाईट करू’ अशी धमकी दिली.
>भाडेकराराने जागा दिली होती
सचिन दासा हे आई शकुंतला, पत्नी आरती, भाऊ अ‍ॅड. आनंद, भावजय पद्मप्रिया आणि मुलांसह राहण्यास आहेत. त्यांचे सुरेंद्र जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. पद्मशाली पंच कमिटी ही समाजाची विश्वस्त संस्था असून या कमिटीच्या मालकीच्या जागा आहेत. त्यापैकी महात्मा फुले पेठेतील समाजातील गरजूंना व्यवसायासाठी संस्थेने भाडेकराराने कायमस्वरूपी जागा दिलेली होती. त्यापोटी आकारले जाणारे भाडे विश्वस्तांना दिले जाते.
>फिर्यादी यांच्याकडून पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी, काही जणांचे जबाब याची खातरजमा केल्यानंतर पद्मशाली पंच कमिटीच्या पदाधिकाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
- राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ निरीक्षक,
खडक पोलीस ठाणे

Web Title: An FIR lodged against Jat Panchayat, boycott of family members including advocates; Sued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.