‘द येल्लो कीड’ ही व्यक्तिरेखा असलेले पहिले व्यंगचित्र
By admin | Published: May 5, 2016 06:05 AM2016-05-05T06:05:12+5:302016-05-05T18:01:59+5:30
जगातील सर्वात पहिले रंगीत व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्याच्या स्मृत्यर्थ ५ मे हा दिवस ‘जागतिक व्यंगचित्र दिन’म्हणून साजरा करण्यात येतो. जोसेफ पुलित्झर यांच्या ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’ या
जगातील सर्वात पहिले रंगीत व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्याच्या स्मृत्यर्थ ५ मे हा दिवस ‘जागतिक व्यंगचित्र दिन’म्हणून साजरा करण्यात येतो. जोसेफ पुलित्झर यांच्या ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’ या वर्तमानपत्रामधील ‘हॉगन्स अॅली’ या गाजलेल्या रंगीत व्यंगचित्र मालिकेतील ‘द येल्लो कीड’ ही व्यक्तिरेखा असलेले पहिले व्यंगचित्र १८९५ साली आजच्या दिवशी प्रसिद्ध झाले. रिचर्ड एफ. आऊटकल्ट यांनी ही मालिका साकारली होती. रविवारच्या पुरवणीत रंगीत व्यंगचित्र मालिका प्रसिद्ध करण्याची ही अमेरिकेतील पहिलीच वेळ होती. ‘येल्लो कीड’ हा पिवळा झगा घातलेला, टकलू मुलगा सामाजिक बाबींवर खुसखुशीत भाष्य करीत असे. अल्पावधीतच तो लहान-थोरांमध्ये प्रसिद्ध झाला. भविष्यात पत्रकारितेत आलेल्या ‘येल्लो जर्नालिझम’ या संकल्पनेची पाळेमुळे या ‘येल्लो कीड’मध्येच असल्याचे मानले जाते.