सिद्धगडावर पहिल्यांदा दीपोत्सव !
By admin | Published: November 2, 2016 02:45 AM2016-11-02T02:45:11+5:302016-11-02T02:45:11+5:30
सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी वीरगती प्राप्त झाली
नेरळ : सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी वीरगती प्राप्त झाली, ते हुतात्मे झाले. तेथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा ज्योत उभारण्यात आली असून पहिल्यांदाच येथे दिवाळीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. पाचशेहून अधिक पणत्या प्रज्वलित करून वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील तसेच क्र ांतिवीरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, या निमित्ताने पवित्र वीरभूमी सिद्धगड येथे प्रथमच दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे येथील क्र ांतिवीर भगत मास्तर यांचे पुत्र भरत भगत आणि धनेश राणे यांच्या संकल्पनेतून या नवीन पर्वाला सुरवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने युवक, शिक्षकवृंद, समाजसेवक शहिदांचे स्मरण म्हणून एक दिवा तेवण्याकरिता उपस्थित होते. यावेळी क्र ांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, कल्पेश डुकरे आदिंनी हुतात्म्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, मानिवली ग्रामपंचायत सदस्य प्रशांत झांजे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
>नवीन पर्व सुरू
वीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील तसेच क्रांतिवीरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, या निमित्ताने पवित्र वीरभूमी सिद्धगड येथे प्रथमच दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे येथील क्रांतीवीर भगत मास्तर यांचे सुपुत्र भरत भगत अणि धनेश राणे यांच्या संकल्पनेतून या नवीन पर्वाला सरुवात करण्यात आली. रविवारी रात्री १२ वाजता पणत्या लावून संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघाला होता.
>सैनिकांसाठी दीपोत्सव
कर्जत : कर्जतकरांच्यावतीने पाडव्याच्या संध्याकाळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांकरिता पणती लावून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांच्या हस्ते भारतमातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व पहिली पणती त्यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश लाड, मिलिंद चिखलकर, अशोक ओसवाल, नगरसेविका सुवर्णा जोशी आदी उपस्थित होते. प्रत्येकाने एक पणती पेटवून सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांकरिता दीपोत्सव साजरा केला. कार्यक्र माचे आयोजन भाजपाचे राहुल कुलकर्णी यांनी केले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.