राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:24 AM2019-01-17T10:24:11+5:302019-01-17T10:42:38+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे गुरुवारी ( दि. १७) सकाळी सात वाजता निधन झाले.

Former MP, Laxmanrao Patil, a senior NCP leader, passed away | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधनमूळगावी बोपेगाव, ता. वाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे गुरुवारी ( दि. १७) सकाळी सात वाजता निधन झाले.

मुंबई येथील जसलोक रुणालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. याच रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी, सातारा जिल्ह्याचे धुरंधर राजकारणी, अशी त्यांची ओळख होती.

कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच वाई-खंडाळा-महाबळेश्वरसह सातारा, कोरेगाव येथील कार्यकर्ते मुंबईला मोठ्या प्रमाणात रवाना झाले आहेत.

दरम्यान, सातारा जिल्ह्याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी बोपेगाव, ता. वाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Former MP, Laxmanrao Patil, a senior NCP leader, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.