सांगलीत जन्मदात्या पित्याचा पोटच्या मुलीवर चार वर्षे बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 08:39 PM2017-09-19T20:39:14+5:302017-09-19T20:39:51+5:30
जन्मदात्या पित्यानेच गेल्या चार वर्षापासून स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. संशयित पिता एसटी महामंडळात वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवेत आहेत.
सांगली, दि. 19 : जन्मदात्या पित्यानेच गेल्या चार वर्षापासून स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. संशयित पिता एसटी महामंडळात वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवेत आहेत. त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित मुलीच्या आईच्या निधन झाल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. मुलगी १७ वर्षाची असल्यापासून पित्याने तिच्यावर अत्याचार सुरु केला. मी तुला जन्माला घातले आहे, त्यामुळे माझा तुझ्यावर अधिकार आहे, असे म्हणून गेली चार वर्षे तो मुलीवर अत्याचार करीत आहे. ही घटना कोणाला सांगितलेच तर तुझा सख्खा भाऊ व तुझ्या सावत्र आईचा सांभाळ करणार नाही, अशी तो धमकी द्यायचा. तिने बाहेर कोणाला हा प्रकार सांगू नये, यासाठी तो मुलीला घराबाहेरही पडून देत नव्हता. मुलीने संधी मिळेल त्यावेळी नातेवाईकांना वडिल करीत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. पण नातेवाईकांनीही या कृत्यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला. तुझी व घराण्याची अब्रू जाईल, तुझा विवाह करुन देतो, अशी तिची समजूत घालण्यात आली.
काही महिन्यापूर्वी वडिलांनी एका मोठ्या शहरात बदली झाली. दुसºया पत्नीला सोबत घेऊन जाण्याऐवजी त्याने मुलीला सोबत नेले. तिथे मुलीने एका ठिकाणी नोकरी पकडली. मात्र त्याने नोकरी सोडायला लावली. तिथेही त्याने अत्याचार केला. पित्याच्या या अत्याचाराला ती कंटाळली होती. काही दिवसापूर्वी तिच्या नात्यातील एक पोलिस अधिकारी भेटला. त्यालाही त्याने हा प्रकार सांगितला. परंतु नातेवाईक पोलिस अधिकाºयानेही घरची अब्रू जाईल, अशी भिती घालून गप्प राहण्यास सांगितले.
कोणीच मदतीसाठी येत नसल्याचे लक्षात येताच ही मुलगी चार दिवसापासून गायब होती. तिच्या नातेवाईकांनी सोमवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहर पोलिस व निर्भया पथकाने मुलीचा शोध सुरु ठेवला. रात्री बारा वाजता ती सावत्र आईच्या घरी सापडली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिने गेल्या चार वर्षानंतर पित्याने केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.