गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा भास्कर जाधवांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 01:30 PM2018-04-12T13:30:05+5:302018-04-12T13:37:10+5:30
यावेळी शिवसेनेने भास्कर जाधव यांच्याविरोधातील नाराजांची भक्कम मोट बांधून चांगलीच मोर्चेबांधणी केली होती.
गुहागर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, यावेळी शिवसेनेने भास्कर जाधव यांच्याविरोधातील नाराजांची भक्कम मोट बांधून चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. या नाराजांकडून शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. त्याचे फळ या निवडणुकीत शिवसेनेला मिळाले. शिवसेनेच्या या भक्कम मोर्चेबांधणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. तर शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीला 9 जागा मिळाल्या. याशिवाय, शिवसेनेला आणखी एका जागेवर वैयक्तिक यशही मिळाले.
निवडणुकीतील विजयी उमेदवार
प्रभाग 1 - सुजाता बागकर -राष्ट्रवादी
प्रभाग २ - उमेश भोसले - भाजप
प्रभाग 3 - मनाली सांगळे - शहर विकास आघाडी
प्रभाग 4 - नेहा सांगळे - शहर विकास आघाडी
प्रभाग 5 - समीर घाणेकर - भाजप
प्रभाग 6 - गजानन वेल्हाळ -भाजप
प्रभाग 7 - नीलिमा गुरव - सेना
प्रभाग 8 - अरुण रहाटे - भाजप
प्रभाग 9 - वैशाली मालप - शहर विकास
प्रभाग 10- प्रसाद बोले - शहर विकास
प्रभाग 11- स्नेहा भागडे - शहर विकास
प्रभाग 12- भाग्यलक्ष्मी कानडे - भाजप
प्रभाग १३ - माधव साटले - शहर विकास
प्रभाग 14 - प्रणित साटले - शहर विकास
प्रभाग 15 - स्नेहल देवाळे - शहर विकास
प्रभाग 16 - अमोल गोयथळे - शहर विकास
प्रभाग 17- मृणाल गोयथळे (भाजप)