मुंबईत काळोख दाटला, औरंगाबाद, नाशिक, अलिबागमध्ये पुढच्या चार तासात मुसळधार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 04:00 PM2017-10-07T16:00:24+5:302017-10-07T18:51:53+5:30

मुंबईच्या आकाशात ढग दाटून आले असून भर दुपारी रात्रीसारखा काळोख पडल्याची स्थिती आहे.

Heavy rains forecast in the next four hours in Mumbai, Kalok Datla, Aurangabad, Nashik and Alibaug. | मुंबईत काळोख दाटला, औरंगाबाद, नाशिक, अलिबागमध्ये पुढच्या चार तासात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत काळोख दाटला, औरंगाबाद, नाशिक, अलिबागमध्ये पुढच्या चार तासात मुसळधार पावसाचा अंदाज

googlenewsNext
ठळक मुद्देआकाशात काळया ढगांची दाटी होऊन काळोख पडला नंतर पावसाला सुरुवात झाली.

मुंबई - मुंबईच्या आकाशात ढग दाटून आले असून भर दुपारी रात्रीसारखा काळोख पडल्याची स्थिती आहे. मुंबईत काल दुपारीही असेच वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात काल दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला होता. 

भारतीय हवामान विभागाने नाशिक, अलिबाग आणि औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात पुढच्या चार तासात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. सोसाटयाच्या वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

मुंबईत शुक्रवारी सकाळी लख्ख ऊन पडले होते. दुपारी अचानक वातावरण बदलले. आकाशात काळया ढगांची दाटी होऊन काळोख पडला नंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे एक भितीचे वातावरण निर्माण झाले होते. काही कार्यालयेही लवकर सोडून देण्यात आली होती. आजही मुंबईत अशीच स्थिती आहे. 
 

Web Title: Heavy rains forecast in the next four hours in Mumbai, Kalok Datla, Aurangabad, Nashik and Alibaug.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.