गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीवर तूर्त बंदी – मुंबई हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 03:24 PM2018-09-14T15:24:18+5:302018-09-14T15:24:49+5:30
गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक म्हटली की डीजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. मात्र, डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टमवर बंदी घालत मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे.
मुंबईः गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक म्हटली की डीजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. मात्र, डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टमवर बंदी घालत मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे.
सण येत जात राहतील पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही, असे हायकोर्टाने सुनावले आहे. त्यामुळे यंदाच्या गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीच्या वापराऐवजी पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमणार आहे.
गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापराला मुंबई हायकोर्टाने तूर्तास परवानगी नाकारली आहे. मात्र, डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे, असा सवाल सुद्धा हायकोर्टाने राज्य सरकारला केला आहे.