कोरेगाव भीमा येथे भीमसैनिकांना मानवंदना

By admin | Published: January 2, 2017 05:21 AM2017-01-02T05:21:43+5:302017-01-02T05:21:43+5:30

पुणे-नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे भीमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी रविवारी विविध पक्ष संघटनांचे नेते-कार्यकर्ते, आंबेडकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते.

Honor to the Grams at Koregaon Bhima | कोरेगाव भीमा येथे भीमसैनिकांना मानवंदना

कोरेगाव भीमा येथे भीमसैनिकांना मानवंदना

Next

लोणी कंद (पुणे) : पुणे-नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे भीमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी रविवारी विविध पक्ष संघटनांचे नेते-कार्यकर्ते, आंबेडकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते.
अभिवादन सभा, भीमगीत गायनाचा कार्यक्रम, बुद्धवंदना, सामुदायिक सलामी अशा कार्यक्रमाने परिसर व्यापून गेला होता. १ जानेवारी १८१८ रोजी पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये भीमा नदीतीरावर युद्ध झाले. त्यामध्ये महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावली आणि पेशवे पराभूत झाले. त्यानिमित्त १८२२ मध्ये या विजयाचे प्रतीक म्हणून विजय रणस्तंभ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर या स्थळाला भेट दिली आणि तमाम दलित बांधवांचे त्याकडे लक्ष वेधले गेले.
केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्षा मीराताई आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, खा. अमर साबळे आदींनी येथे भेट देऊन मानवंदना दिली. सकाळी बुद्धवंदना झाली. त्यानंतर सामुदायिक मानवंदना देण्यात आली. समता सैनिक दलाच्या वतीने शेकडो जवानांच्या उपस्थितीत संचलन करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Honor to the Grams at Koregaon Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.