आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र कसे भरायचे?

By admin | Published: January 24, 2017 10:54 PM2017-01-24T22:54:12+5:302017-01-24T22:54:12+5:30

उमेदवारांना मनपाच्या वेबसाइटवर आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र सादर करावे लागणार आहे. मंगळवारी मनपाच्या मुख्य सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

How to fill in nomination through online system? | आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र कसे भरायचे?

आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र कसे भरायचे?

Next

महापालिकेच्या सभागृहात पार पडली कार्यशाळा

अकोला: महापालिकेची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना यंदा प्रथमच आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र सादर करावे लागेल. नामनिर्देशनपत्र सादर करताना इच्छुक ांचा गोंधळ उडणार नाही, या अनुषंगाने राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सायबर कॅफे, सेतू केंद्र संचालकांना माहिती देण्यासाठी मंगळवारी मनपाच्या मुख्य सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना मनपाच्या वेबसाइटवर आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र सादर करावे लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया संगणकाच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ही प्रक्रिया होत असल्याने इच्छुकांची धांदल, गोंधळ उडणार हे मानल्या जात आहे. त्या पृष्ठभूमीवर महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या वतीने आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र कसे भरायचे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मनपाच्या मुख्य सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक तथा इच्छुकांची उपस्थिती होती. यावेळी सहायक आयुक्त जीतकुमार शेजव, संगणक विभागाचे योगेश मारवाडी, हेमंत रोजतकर यांनी मार्गदर्शन केले. आॅनलाइन अर्जामध्ये इच्छुक उमेदवारांनी इत्थंभूत माहिती सादर केल्यानंतर त्याची निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) नोंद होईल. नोंद झाल्यानंतर सादर केलेल्या अर्जाची प्रत मनपा निवडणुकीची जबाबदारी सोपवलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपवावी लागेल. त्यावेळी अर्जाच्या प्रतीसोबत शपथपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. कार्यशाळेला सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहायक आयुक्त प्रज्ञा खंदारे यांची उपस्थिती होती.

-------------
दुरुस्तीसाठी क्रमांक दिला जाईल
संगणक, इंटरनेट वापराचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडूनच आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून घ्यावा. निवडणुकीचा अर्ज आॅनलाइन पद्धतीने भरताना त्यामध्ये काही चुका होऊन अर्जाची नोंद झाल्यास उमेदवारांनी घाबरण्याचे कारण नाही. त्या वेबसाइटवर जाऊन पुन्हा अर्जातील त्रुटी दूर करता येतील. त्यासाठी संबंधित उमेदरावाला विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे.

 

Web Title: How to fill in nomination through online system?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.