मी जन्मत:च शिवसैनिक, चौकीदार नव्हे : उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:43 PM2019-04-01T17:43:39+5:302019-04-01T17:44:19+5:30

आपण चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्धव यांनी आपण काँग्रेसमुक्त भारताच्या बाजूने नसल्याचे म्हटले आहे.

I was born a Shiv Sainik, not a janitor: Uddhav Thackeray | मी जन्मत:च शिवसैनिक, चौकीदार नव्हे : उद्धव ठाकरे

मी जन्मत:च शिवसैनिक, चौकीदार नव्हे : उद्धव ठाकरे

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या 'मै भी चौकीदार' या मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून देशभरात 'मै भी चौकीदार' मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत भाजप नेत्यांनी मोठा सहभाग नोंदवला असून सोशल मीडियावरील आपल्या नावाआधी अनेकांनी चौकीदार असं लिहिलेले आहे. परंतु, एनडीएमधील मित्र पक्षांनी या मोहिमेपासून अंतर ठेवले आहे.

आपण चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्धव यांनी आपण काँग्रेसमुक्त भारताच्या बाजूने नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सभेत काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत असतात. परंतु, उद्धव यांनी यापासून फारकत घेतली आहे. मला चौकीदार होण्याची गरज नसून मी जन्मत:च शिवसैनिक आहे. त्यामुळे मी कायम शिवसैनिकच राहिल. काँग्रेसमुक्त अभियानासाठी आपण काम करत नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे देण्याचे आपण ठरवल्याचे उद्धव म्हणाले. दरम्यान आयोध्येतील राममंदिर बांधण्यासाठीच्या हालचालींना वेग न आल्यास आपण पुन्हा एकदा आयोध्येचा दौरा करणार असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे नुकतेच अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरातला गेले होते. त्यानंतर उद्धव यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव यांच्यावर कडाडून टीका केली आहे. भाजपवर टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख गुजरातला काय मुका घेण्यासाठी गेले होते, का असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.

Web Title: I was born a Shiv Sainik, not a janitor: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.