मुलगी कुरूप असेल तर द्यावा लागतो जास्त हुंडा, १२ वीच्या पुस्तकात संतापजनक विधान
By admin | Published: February 3, 2017 09:26 AM2017-02-03T09:26:07+5:302017-02-03T09:41:12+5:30
'जर मुलगी कुरूप असेल तर पालकांना जास्त हुंडा द्याव लागतो' असे संतापजनक विधान बारावीच्या पुस्तकातील धड्यात करण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - 'जर मुलगी कुरूप असेल तर पालकांना जास्त हुंडा द्याव लागतो' हे धक्कादायक आणि तितेकच संतापजनक विधान एखाद्या नेत्याने नव्हे तर महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या बारावीच्या पुस्तकातील आहे. १२वीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकातील एक धड्यात हे विधान करण्यात आले असून यामुळे सर्व स्तरांतून टीका आणि चीड व्यक्त होत आहे. देशातील प्रमुख सामाजिक समस्या’ असा धडा समाजशास्त्राच्या पुस्तकात असून त्या 'कुरूपता' हे हुंड्यामागचे एक प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ' मुलगी कुरुप किंवा दिव्यांग असेल तर तिच्या पालकांना जास्त हुंडा द्यावा लागतो' असे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने प्रमाणित केलेल्या या धड्यात म्हटले आहे.
हुंडा का देतात किंवा घेतात? हे अनेक घटकांवर अवलंबून असते. ' जात, धर्म, सामाजिक प्रतिष्ठा यासारख्या अनेक कारणांपैकी मुलीची कुरुपता किंवा व्यंग हेही हुंड्याचे एक कारण असतं' असे त्यात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर 'कुरुपतेमुळे मुलीचं लग्न जमवणं कठीण होतं. तिचं लग्न जमवण्यासाठी कुटुंबीय हतबलतेतून मुलाला हुंडा देतात. त्यातून हुंड्यासारख्या प्रथांना प्रोत्साहन मिळतं', असंही या पुस्तकात म्हटलं आहे.
या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून अनेक स्वयंसेवी संघटनांनी या पुस्तकांवर टीका केली आहे.