जलप्रदूषण केल्यास उद्योगांना आता दीडपट दंड !

By admin | Published: June 14, 2016 02:51 AM2016-06-14T02:51:23+5:302016-06-14T02:51:23+5:30

उद्योगाचे पाणी अथवा सांडपाणी नदी, नाले, तलावात सोडून जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांना आता दीडपट दंडाची तरतूद करण्यात आले आहे. तसेच नोंदणी असणाऱ्या लहान उद्योगांना

If the water pollution, the industry is now fined! | जलप्रदूषण केल्यास उद्योगांना आता दीडपट दंड !

जलप्रदूषण केल्यास उद्योगांना आता दीडपट दंड !

Next

अमरावती : उद्योगाचे पाणी अथवा सांडपाणी नदी, नाले, तलावात सोडून जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांना आता दीडपट दंडाची तरतूद करण्यात आले आहे. तसेच नोंदणी असणाऱ्या लहान उद्योगांना यापुढे बाहेर पडणारे पाणी दूषित नसल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल सिंचन विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
उद्योगाला नदीतून पाण्याचा वापर करण्यासाठी उन्हाळ्यात २४ रुपये, हिवाळ्यात १६ रूपये व पावसाळ्यात ८ रूपये दर आकारला जातो.
मात्र, एखाद्या उद्योगाने हेच पाणी दूषित केले तर ज्या उद्योगाला महिन्याला १ लाख रुपये बिल येत असेल तर त्याला दीड लाख रुपये दंड ठोठावला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: If the water pollution, the industry is now fined!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.