जिजाऊंचे तैलचित्र रेखाटणा-याची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:26 AM2018-03-08T04:26:07+5:302018-03-08T04:26:07+5:30

मंत्रालयातील जुन्या इमारतीच्या दर्शनीभागात लावण्यात आलेले मांसाहेब जिजाऊ यांचे भव्य तैलचित्र माझ्या संमतीविनाच लावण्यात आले असून त्याचे मानधनही मिळालेले नाही, अशी खंत तैलचित्रकार बंडू मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

Ignore Jijau's oil paintings | जिजाऊंचे तैलचित्र रेखाटणा-याची उपेक्षा

जिजाऊंचे तैलचित्र रेखाटणा-याची उपेक्षा

googlenewsNext

- गणेश देशमुख
मुंबई - मंत्रालयातील जुन्या इमारतीच्या दर्शनीभागात लावण्यात आलेले मांसाहेब जिजाऊ यांचे भव्य तैलचित्र माझ्या संमतीविनाच लावण्यात आले असून त्याचे मानधनही मिळालेले नाही, अशी खंत तैलचित्रकार बंडू मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
अमरावतीचे तैलचित्रकार बंडू मोरे यांनी इतिहासातील वर्णन वाचून जिजाऊंचे अप्रतिम असे तैलचित्र रेखाटले. मोरे यांनी रेखाटलेले हे एकमेवाद्वितीय तैलचित्र असून आज सर्वत्र याच तैलचित्राच्या फोटोकॉपीज उपलब्ध आहेत. १९१८ साली तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे अमरावतीच्या दौ-यावर आले असता, तेथील सर्किट हाऊसमध्ये लावण्यात आलेले ते तैलचित्र पाहून त्यांनी बंडू मोरे यांना बोलवून घेतले. मांसाहेबांची प्रतिमा कुठेच उपलब्ध नाही, असे बाबासाहेब पुरंदरे यांनी मला सांगितले होते, अशी माहितीही त्यांनी मोरे यांना दिली.

मांसाहेब जिजाउंचे तैलचित्र सर्वात अगोदर मी रेखाटले आहे. मात्र, मनोहर जोशी यांनी मला अंधारात ठेवून मी रेखाटलेले तैलचित्र मंत्रालयात लावले. त्यावेळी सन्मान डावलला गेला; आता मानधन तरी मिळावे, एवढीच अपेक्षा.
- बंडू मोरे, तैलचित्रकार

Web Title: Ignore Jijau's oil paintings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.