मजुराला विवरणपत्र मागणे अमानवीय
By admin | Published: May 10, 2017 02:26 AM2017-05-10T02:26:23+5:302017-05-10T02:26:23+5:30
मजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या मजुराला आयकर विवरणपत्र मागणे अमानवीय आहे. एवढेच नाही तर ही बाब एका
विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या मजुराला आयकर विवरणपत्र मागणे अमानवीय आहे. एवढेच नाही तर ही बाब एका दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा मानसिक व शारीरिक छळ ठरते. मजूर माणूस खरेच आयकर भरत असेल काय, याचे भान विमा कंपनी विसरली आहे, असे मत जिल्हा ग्राहक न्यायालयाने एका निकालात नोंदविले आहे.
अपघाती मृत्यूप्रकरणी विमा दाव्याची भरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध दिलेल्या निकालात मंचाने ही बाब नमूद करीत विमा कंपनीला चपराक दिली आहे. नेर येथील रेखा किसनराव भोयर यांनी मुलाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाने दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला दंड ठोठावला आहे. शिवाय विमा कंपन्यांच्या व्यवहारावर ताशेरे ओढले आहेत. नेर येथील रवी किसनराव भोयर हा मजूर विहिरीत उतरून गाळ उपसत असताना क्रेनने विहिरीतील गाळासोबत आलेला दगड डोक्यावर पडून गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याची दोन लाखांची पॉलिसी होती.