‘आयटीआय’ची प्रवेशप्रक्रिया सुरू
By admin | Published: July 8, 2014 11:57 PM2014-07-08T23:57:42+5:302014-07-08T23:57:42+5:30
मागील काही दिवसांत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मधील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या तारखा बदलल्याने विद्याथ्र्यामध्ये गोंधळ उडाला होता.
Next
>पुणो : मागील काही दिवसांत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मधील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या तारखा बदलल्याने विद्याथ्र्यामध्ये गोंधळ उडाला होता. अखेर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने मंगळवारी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. तसेच, प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्यासही मंगळवारपासूनच सुरुवात झाली. राज्यातील शासकीय ‘आयटीआय’मधील सुमारे 98 हजार जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
दहावीच्या निकालानंतर ‘आयटीआय’मधील विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणो अपेक्षित होते. मात्र, दोन आठवडे उलटूनही संचालनालयामार्फत वेळापत्रक जाहीर केले गेले नव्हते. तसेच, वेळापत्रक जाहीर करण्याच्या तारखाही बदलण्यात आल्या. त्यामुळे विद्याथ्र्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर, मंगळवारी संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, दि. 22 जुलैर्पयत अंतिम मुदत असेल. त्यानंतर दि. 24 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. दि. 28 जुलैपासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू होईल.
प्रवेशाच्या एकूण सहा फे:या होणार असून, त्याबाबतच्या माहितीसाठी प्रत्येक ‘आयटीआय’मध्ये दि. 22 जुलैर्पयत सकाळी 1क् ते 11 या वेळेत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया दि. 31 ऑगस्टर्पयत सुरू राहणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत राज्यात असलेल्या 25क् संस्थांमधील ठराविक अभ्यासक्रमातील 2क् टक्के जागा ‘विशेष प्रशिक्षण शुल्क’ आकारून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. त्या जागांसाठी इच्छुकांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत स्वतंत्र पर्याय देण्याची मुभा राहणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
आरक्षणासाठी जातीचा दाखला
समांतर आरक्षणासाठी आवश्यक
कागदपत्रे
गुणाधिक्य, तालुकाबंधनातून सूट
यासाठी सक्षम अधिका:याची
प्रमाणपत्रे
ऑनलाईन अर्जाची प्रत
प्रवेश नोंदणी पावती व निवडपत्र