भावानेच घेतली खुनाची सुपारी
By Admin | Published: July 12, 2014 11:56 PM2014-07-12T23:56:14+5:302014-07-12T23:56:14+5:30
डुकरे चोरल्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गेल्या रविवारी रात्री सिंहगड रस्त्यावर घडली होती.
पुणो : डुकरे चोरल्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गेल्या रविवारी रात्री सिंहगड रस्त्यावर घडली होती. हा खून कुणी बाहेरच्याने नाही, तर लहान भावानेच केल्याचे उघडकीस आले असून, मोठय़ा मुलाच्या खुनाची सुपारी लहान भावाला खुद्द वडिलांनीच दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वडिलांसह दोन भावांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांनी दिली.
बाप्पू अशोक माने (वय 27, रा. शांती कॉर्नरसमोर, आनंदनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वडील अशोक बबन जाधव (वय 57, रा. आनंदनगर), भाऊ किरण ऊर्फ चिंग्या अशोक माने (वय 24), लाल्या ऊर्फ बंडू अशोक माने (वय 22) यांना अटक करण्यात आली आहे. अशोक यांना तीन मुले असून, यातील लाल्या याला त्याच्या मावशीने दत्तक घेतलेले आहे. तो सासवड येथे मावशीकडेच राहतो.
गेल्या रविवारी रात्री बाप्पू याचा खून झाला होता. बाबा जाधव नावाच्या तरुणाने बाप्पूला उचलून नेल्याचे, तसेच त्यांनीच मारहाण करून खून केल्याची फिर्याद त्याच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांच्या कामावर आक्षेप घेत त्याच्या वडिलांनी आयुक्तालयात पोलिसांविरुद्ध तक्रारही केली. दरम्यान, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त जयवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांनी कुटुंबीयांच्या मोबाईलचे डिटेल्स काढले. मोबाईलमधील क्रमांकानुसार एकेकाला चौकशीला बोलावण्यात आले. या चौकशीमध्ये वडिलांनीच स्वत:च्या खुनाचा कट आखल्याचे समोर आल्यावर पोलीस अवाक झाले. तातडीने पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून किरण आणि लाल्या याला ताब्यात घेण्यात आले. बाप्पूला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दुस:यांची डुकरे चोरायचा. यावरून भांडणो होत असत. चिंग्याला त्यामुळे अनेकदा मार खावा लागला. याचा राग वडिलांच्या मनात होता. वडिलांनी लाल्या याला बोलावून घेऊन सासवडच्या तरुणांकडून बाप्पूला मारण्याविषयी सूचना दिल्या. सुरुवातीला लाल्याने याला हरकत घेतली, पण वडिलांच्या आग्रहाखातर त्याने सासवडचे तरुण मित्र गोळा करून 6 जुलैला रात्री बाप्पूला घरासमोरून गाडीमध्ये नेऊन त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर आई व भावांनी त्याला दवाखान्यात न नेता रात्री साडेदहाच्या सुमारास घरी आणले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
(प्रतिनिधी)
4खुनाचा तपास करीत असताना पोलिसांनी बाबा जाधवला अटक केली खरी, परंतु कुटुंबीयांचे वागणो संशयास्पद वाटू लागल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमधून आरोपी सुटू शकले नाहीत. या प्रकरणात आईलाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव, सहायक निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस हवालदार रघुनाथ जाधव, संतोष सावंत, सचिन ढवळे, कुदळे, सुतार, गवळी, जमदाडे, मोहिते यांच्या पथकाने केली.