कोल्हापूर सैन्यभरती : पहिल्या दिवशी ३ हजार ४७७ उमेदवारांची हजेरी
By admin | Published: February 3, 2016 08:26 PM2016-02-03T20:26:56+5:302016-02-03T20:26:56+5:30
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी सैन्यभरती प्रक्रियेला शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडासंकुलात आज बुधवारी पहाटे सुरुवात झाली.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी सैन्यभरती प्रक्रियेला शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडासंकुलात आज बुधवारी पहाटे सुरुवात झाली.
राज्यात प्रथमच जिल्हानिहाय ऑनलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविली जात असून तब्बल ५७ हजार उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. आज पहिल्या दिवशी रत्नागिरी जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी २ हजार ४७७ उमेदवारांनी हजेरी लावली.
भरती प्रक्रियेचे नियोजन जिल्हा सैनिक कार्यालय व सैन्यभरती कार्यालयातर्फे केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी तसेच गोव्यासाठी २० फेब्रुवारीअखेर भरती मेळावा होईल. यामध्ये सोल्जर जनरल डय़ुटी, सोल्जर क्लार्क, स्टोअरकीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर ट्रेडस्मन पदे आहेत.