नाशिकच्या बाजारात कोथिंबिरची जुडी चक्क एक रुपयाला..! लीलावात मिळाला कवडीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 07:57 PM2017-08-27T19:57:58+5:302017-08-27T20:06:51+5:30
रविवारी (दि.२७) बाजार समितीत झालेल्या लिलावादरम्यान बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला. रविवारी हजार रुपये शेकड्यावरुन थेट शंभर रुपये शेकड्यावर दर घसरले.
संदीप झिरवाळ, आॅनलाईन लोकमत, नाशिक : आठवडाभरामध्ये तीन ते चार दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला राहिल्यामुळे त्याचा फटका शेतमालाला बसला आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यामुळे कोथिंबिरला अवघा प्रती जुडी एक रुपया असा बाजारभाव मिळाला. यामुळे बळीराजाने पुन्हा संताप व्यक्त केला आहे. रविवारी (दि.२७) बाजार समितीत झालेल्या लिलावादरम्यान बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला. रविवारी हजार रुपये शेकड्यावरुन थेट शंभर रुपये शेकड्यावर दर घसरले.
बाजारसमितीत दोन महिन्यांपुर्वी तब्बल १८७ रूपये प्रति जुडी असा कोथिंबीरने उच्चांक गाठला होता. शनिवारच्या दिवशी सायंकाळी लिलावात कोथिंबीरच्या प्रतीजुडीला चक्क १रूपया असा मातीमोल बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्च तर लांबच वाहतूक खर्चही सुटला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी दिल्या.
काही दिवसांपुर्वी पावसाने उघडीप दिलेली होती. त्यातच कोथिंबीरला पोषक वातावरण असल्याने आवक वाढली होती. पंधरवाडयापासून कोथिंबीरला कमीत कमी १ हजार ते पंधराशे रूपये शेकडा असा बाजारभाव मिळत होता. मात्र बाजारसमतिीत मोठया प्रमाणात आवक वाढल्याने त्यातच पावसामुळे कोथिंबीर माल भिजल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला व शनिवारच्या दिवशी कोथिंबीरचे बाजारभाव कोसळण्यास सुरूवात झाली. दोन मिहन्यांपुर्वी ४० ते ५०रूपये प्रति जुडी दराने बाजारात कोथिंबीर विक्र व्हायची मात्र आता कोथिंबीर ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाचा जोर आणखी काही दिवस सुरूच राहीला तर शेतातील उभ्य पिकाची नासाडीची शक्यता वर्तिवली जात आहे. सध्या सर्वत्र पाऊस सुरू झाल्याने शेतमालाला उठाव नाही त्यातच नाशिक बाजारसमितीत अन्य बाजारसमितीच्या तुलनेत विक्र ीसाठी तीप्पट कोथिंबीरची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले आहेत.