एसटीच्या स्लीपर कोच सेवेला अखेरची घरघर
By admin | Published: September 21, 2014 02:28 AM2014-09-21T02:28:58+5:302014-09-21T02:28:58+5:30
खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेकडील असलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी महामंडळाने एसी स्लीपर सेवा सुरू केली.
Next
मुंबई : खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेकडील असलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी महामंडळाने एसी स्लीपर सेवा सुरू केली. मात्र सव्वा वर्षापूर्वी सुरू केलेल्या या सेवेला एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका बसला असून, याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आणि अखेर ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यार्पयत या सेवेची अखेरची मुदत असून, ती सुरू ठेवायची की नाही यावर पुनर्विचार केला जात आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुरुवातीला लाल डबा असणारी बस काळानुरूप बदलत गेली. प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्यासाठी अनेक सेवा सुरू केल्या. यात खासगी बस ट्रॅव्हल्सचे आव्हान मोडून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करताना रेल्वेकडील प्रवासीही आकर्षित करण्यासाठी महामंडळाने सव्वा वर्षापूर्वी स्लीपर व्होल्वो बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही बस एका खासगी कंपनीकडून घेऊन एसटी महामंडळ ती सेवा चालवत होते. मुंबईतून कोल्हापूर आणि बंगळुरू मार्गावरून प्रवास करणा:या प्रवाशांची असणारी संख्या पाहता या मार्गावर ही बस चालवण्यात आली. 32 आसन व्यवस्था असणा:या अशा सुरुवातीला दोन बसेस चालवण्यात आल्या. मात्र एका प्रवाशामागे 1,400 ते 1,500 रुपये असणारे भाडे आणि खासगी कंपनीची बस असल्याने त्यांनी केलेले दुर्लक्ष पाहता सगळाच कारभार विस्कळीत होता.
अव्वाच्या सव्वा असणारे भाडे आणि एजन्टकडून न दाखवण्यात आलेली रुची तसेच एसटी महामंडळाचे नसलेले नियंत्रण पाहता या सेवेकडे प्रवाशांनी अक्षरश: पाठ दाखवण्यास सुरुवात केली. महामंडळाला ही बस चालवणो आता फारच कठीण असल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळातील सूत्रंकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
तीन महिन्यांची मुदत ही बस मालकीची असलेल्या खासगी कंपनीला देण्यात आली असून, ऑक्टोबर महिन्याच्या
16 तारखेर्पयत ती संपुष्टात येत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर सेवा बंद करण्यात येणार आहे; तरीही सेवा सुरू ठेवायची की नाही यावर अद्याप विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.