संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 11:11 AM2017-10-17T11:11:25+5:302017-10-17T11:40:06+5:30

सातव्या वेतनसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य आहे. 

Legal action should not be taken if the deal is not withdrawn, it is impossible to implement Seventh Pay Commission for next 25 years | संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य 

संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य 

googlenewsNext

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चुकीचा आहे संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा एसटी व्यवस्थापकीय संचालकांनी दिला आहे. कामगारांचा संप बेकायदेशीर असून काँग्रेसचे छाजेड नावाचे नेते कामगारांची दिशाभूल करत आहेत.  एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकार सहानुभूतीने विचार करीत आहे. मात्र सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य करणे शक्य नाही. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा आयोग लागू करणे शक्य नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी दिला आहे. अशा परस्थित परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा आयोग कसा लागू करणार असा सवाल परिवहन मंत्री रावते यांनी उपस्थित केला.

सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये. प्रवासीच आपले अन्नदाता आहेत. त्यांचा विचार करावा. हा संप कामगारांच्या हिताचा नाही. याने कामगारांचेच नुकसान होणार आहे. प्रवाशांचा विचार करुन संप मागे घ्यावा , असे आवाहन रावते यांनी केले.

कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने संप चुकीचा ठरवला आहे, त्यामुळे संप मागे न घेतल्यास कोर्टाच्या आदोशाप्रमाणे कारवाई होईल अशी माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी  दिली. त्याचप्रमाणे परिवाहनमंत्री दिवाकर रावते यांनीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सातव्या वेतनसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य आहे. 

वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे, बीड यासरख्या शहरातील बस आगारातून एकही एसटी बाहेर पडलेली नाही. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत. दरम्यान, कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे.  कागल बसस्थानकात पुणे-बेळगाव एसटीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. तर बीडमधील अंबेजोगाईत परिवाहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं आहे. 

आज पासून दिवाळीला सुरुवात झाली असून दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे तर जास्तच हाल आहेत. ऐन दिवाळीत संप होणार नाही, रात्रीत काही तोडगा निघेल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. त्यामुळे पहाटे निघणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी काही जण आले होते. मात्र त्यांना रखडत बसावे लागले. इतर वेळी एस टी स्टँडच्या आवारात अनेक खासगी गाड्या प्रवाशांना आवाहन करत असतात. मात्र संपाच्या भीतीमुळे आज खासगी गाड्याही नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

 

Web Title: Legal action should not be taken if the deal is not withdrawn, it is impossible to implement Seventh Pay Commission for next 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.