‘मृत्युंजय प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 09:59 PM2017-09-07T21:59:26+5:302017-09-07T21:59:33+5:30

‘मृत्युंजय’ काय शिवाजी सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना तर समाजकार्य विषयक पुरस्कार कोल्हापूर येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेला जाहीर झाला आहे. 

The literary award given by 'Muktijay Pratishthan' Aruna Dhere provided | ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना प्रदान

‘मृत्युंजय प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना प्रदान

Next

पुणे, दि. 7 - ‘मृत्युंजय’ काय शिवाजी सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना तर समाजकार्य विषयक पुरस्कार कोल्हापूर येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेला जाहीर झाला आहे. 

पुरस्काराचे हे १४ वे वर्ष असून, १८ सप्टेंबर रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी पुणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर आणि मृणालिनी सावंत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे यांनी गुरुवारी दिली. साहित्यकृतीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमात डॉ. ढेरे यांचे ‘महाभारत आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. 

Web Title: The literary award given by 'Muktijay Pratishthan' Aruna Dhere provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.