महाराष्ट्राच्या ४८ पैकी ३३ लोकसभा मतदारसंघांतील लढती ठरल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:55 PM2019-03-23T17:55:34+5:302019-03-23T17:58:06+5:30
शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने टप्प्याटप्प्याने उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाला वेग आला आहे. महाराष्ट्रातही राजकीय धुळवड जोरात सुरू आहे. तिकिटासाठी रांगा लावून उभे असलेले नेते, तिकीट न मिळाल्यास बाजूच्या 'विंडो'वर जात आहेत. त्यामुळे तिथल्या रांगेतील लोक नाराज होत आहेत. काही जण ही 'मन की बात' उघडपणे बोलून दाखवत आहेत, काही जण कुजबुजत आहेत, तर काहींची आतल्या आत घुसमट होतेय. लोकसभा निवडणुकीत 'काँटे की टक्कर' असेल ती युती आणि आघाडीमध्येच. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने टप्प्याटप्प्याने उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांपैकी ३३ ठिकाणच्या लढती निश्चित झाल्या आहेत. कोणते आहेत हे मतदारसंघ आणि कोण आहेत तिथले उमेदवार, याची एक यादी...
१. नंदुरबार
डॉ. हीना गावित (भाजपा) वि. के. सी. पाडवी (काँग्रेस)
२. धुळे
डॉ. सुभाष भामरे (भाजपा) वि. कुणाल पाटील (काँग्रेस)
३. जळगाव
स्मिता वाघ (भाजपा) वि. गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
४. बुलडाणा
प्रतापराव जाधव (शिवसेना) वि. डॉ राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
५. वर्धा
रामदास तडस (भाजपा) वि. अॅड. चारुलता टोकस (काँग्रेस)
६. नागपूर
नितीन गडकरी (भाजपा) वि. नाना पटोले (काँग्रेस)
७. गडचिरोली-चिमूर
अशोक नेते (भाजपा) वि. डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस)
८. चंद्रपूर
विनायक बांगडे (काँग्रेस) वि. हंसराज अहिर (भाजपा)
९. यवतमाळ -वाशिम
माणिकराव ठाकरे (काँग्रेस) वि. भावना गवळी (शिवसेना)
१०. परभणी
राजेश विटेकर (राष्ट्रवादी) वि. संजय जाधव (शिवसेना)
११. जालना
रावसाहेब दानवे (भाजपा) वि. विलास औताडे (काँग्रेस)
१२. औरंगाबाद
चंद्रकांत खैरे (शिवसेना) वि. सुभाष झांबड (काँग्रेस)
१३. दिंडोरी
धनराज महाले (राष्ट्रवादी) वि. डॉ. भारती पवार (भाजपा)
१४. नाशिक
समीर भुजबळ (राष्ट्रवादी) वि. हेमंत गोडसे (शिवसेना)
१५. भिवंडी
कपिल पाटील (भाजपा) वि. सुरेश टावरे (काँग्रेस)
१६. कल्याण
श्रीकांत शिंदे (शिवसेना) वि. बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
१७. ठाणे
राजन विचारे (शिवसेना) वि. आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
१८. उत्तर मध्य मुंबई
पूनम महाजन (भाजपा) वि. प्रिया दत्त (काँग्रेस)
१९. दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे (शिवसेना) वि. एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
२०. मुंबई दक्षिण
मिलिंद देवरा (काँग्रेस) वि. अरविंद सावंत (शिवसेना)
२१. रायगड
अनंत गीते (शिवसेना) वि. सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
२२. मावळ
पार्थ पवार (राष्ट्रवादी) वि. श्रीरंग बारणे (शिवसेना)
२३. बारामती
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) वि. कांचन कुल (भाजपा)
२४. शिरूर
शिवाजी आढळराव पाटील (शिवसेना) वि. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
२५. अहमदनगर
डॉ. सुजय विखे (भाजपा) वि. संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
२६. शिर्डी
सदाशिव लोखंडे (शिवसेना) वि. भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
२७. बीड
डॉ. प्रीतम मुंडे (भाजपा) वि. बजरंग सोनावणे
२८. उस्मानाबाद
ओमराजे निंबाळकर (शिवसेना) वि. राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)
२९. लातूर
सुधाकर शृंगारे (भाजपा) वि. मच्छलिंद्र कामंत (काँग्रेस)
३०. सोलापूर
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) वि. जयसिद्धेश्वर स्वामी (भाजपा)
३१. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
विनायक राऊत (शिवसेना) वि. निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
३२. हातकणंगले
धैर्यशील माने (शिवसेना) वि. राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
३३. कोल्हापूर
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) वि. संजय मंडलिक (शिवसेना)