... अखेर राष्ट्रवादीला उदयनराजेंची आठवण आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 13:31 IST2019-04-15T13:27:22+5:302019-04-15T13:31:06+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उदयनराजे यांना स्थान देण्यात आले नव्हते. आता उदनयराजे यांनी सातारा सोडून इतर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करावा, अशी गळ त्यांना घालण्यात येत आहे.

... अखेर राष्ट्रवादीला उदयनराजेंची आठवण आली
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनेक नेत्यांना वगळण्यात आले होते. त्यावरून अनेक वादही निर्माण झाले होते. परंतु, काही नेते असे आहेत, की त्यांना स्टार प्रचारकाचा टॅग लावून घेण्याची गरज भासत नाही. यामध्ये सर्वप्रथम नाव येते ते म्हणजे सातारा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदनयराजे भोसले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उदयनराजे यांना स्थान देण्यात आले नव्हते. आता उदनयराजे यांनी सातारा सोडून इतर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करावा, अशी गळ त्यांना घालण्यात येत आहे. उदयनराजे यांनी नुकतीच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदार संघात सभा घेतली. या सभेत उदयनराजे यांनी चौफेर फटकेबाजी केली.
या सभेत उदनयराजे यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मतदारांना आवाहन केले. उदयनराजे राज्यभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. मात्र त्यांना केवळ मावळ मतदार संघासाठीच का बोलवण्यात आले असा प्रश्न उपस्थित आहे. सातारा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवणारे उदयनराजे यांना महाराष्ट्रातील इतर मतदार संघात प्रचारासाठी का बोलवले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
उदयनराजे यांनी मावळमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. गरीबांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार होते. मात्र यांनी केसांनी लोकांचा गळा कापला. त्यांना फक्त तुमचं मत हवं, असही उदयनराजे यांनी सांगितले.