उद्धव ठाकरेंपेक्षा राज यांना माध्यमांवर जास्त टीआरपी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 02:49 PM2019-04-19T14:49:35+5:302019-04-19T15:03:55+5:30
पुण्यात राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. याचं वेळी दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथील देवरूख येथे सभा सुरु होती. दोन्ही सभांचा एकच वेळ होता. उद्धव यांचे भाषण सुरु होते. त्यावेळी राज यांचे भाषण सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येत होते.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सभांचा धडका लावला आहे. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता राज हे प्रचार सभा घेत भाजपला झोडपून काढत आहे. राज यांच्या सभेला माध्यमांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे यांच्या सभा संध्याकाळच्या वेळी घेतल्या जातात. राज यांचे भाषण सुरु होताच सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवर थेटप्रक्षेपण दाखवले जात आहे.गुरुवारी पुण्यात राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. याचं वेळी दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथील देवरूख येथे सभा सुरु होती. दोन्ही सभांचा एकच वेळ होता. उद्धव यांचे भाषण सुरु होते. त्यावेळी राज यांचे भाषण सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येत होते.
याआधी सोमवारी नांदेड येथे राहुल गांधी यांची सभा सुरु असताना राज ठाकरे यांची सोलापूर येथे सभा सुरु होती. यावेळी सुद्धा मराठी वृत्तवाहिन्यांवर राज ठाकरे यांना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे राज यांचा टीआरपी अधिक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे प्रमाणेच आक्रमकपणे भाषण करतात. आपल्या भाषणातून विरोधकाची ज्या प्रमाणे ते टिंगल उडवतात त्याच प्रमाणे बाळासाहेब सुद्धा विरोधकांना घाम फोडायचे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जरी उद्धव ठाकरे पुढे नेण्याचा प्रयत्न करत असले तरीही राज ठाकरेंप्रमाणे त्यांना प्रसिद्धी मिळत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.