....जेव्हा आठवलेंसमोर अवतरला पोलीस कवी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 03:57 PM2019-05-12T15:57:41+5:302019-05-12T17:46:36+5:30
रविवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले औसा तालुक्यातील दुष्काळाची पाहणी दौऱ्यावर आले असताना, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
लातूर- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता राज्यातच नव्हेतर देशभर चर्चेच्या ठरतात. मात्र, लातूर मधील औसा तालुक्यात दुष्काळ पाहणीदरम्यान आठवले यांना एक असा कवी भेटला की, खुद्द आठवले सुद्धा त्याच्या कवितीने आश्चर्यचकित झाले. पोलीस कर्मचारी दिलीप लोधे यांनी दुष्काळाची दाहकता कवितेमधून रामदास आठवले यांच्यासमोर मांडण्याच्या प्रयत्न केला. यावेळी आठवलेंनी कविता शांतपणे आयकून घेतली.
रविवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले औसा तालुक्यातील दुष्काळाची पाहणी दौऱ्यावर आले असताना, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र, यावेळी बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी दिलीप लोभे यांनी आठवलेंन समोर कविता सादर करण्याची इच्छा व्यक्त केली. 'आम्ही बंदोबस्तात आहोत दक्ष, तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे घाला लक्ष' असे म्हणत त्यांनी दुष्काळ आणि सरकारची भूमिका कवितेमधून सादर केली.
जेव्हा @RamdasAthawale यांच्या समोर अवतारला पोलीस कवी....'आम्ही बंदोबस्तात आहोत दक्ष, तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे घाला लक्ष'. pic.twitter.com/1FTo06H9jv
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2019
पोलीस कर्मचारी दिलीप लोभे यांनी कविता सादर केल्यानंतर आठवलेंन त्यांचे कौतुक केले. शिवाय ग्रामीण भागातही आपल्यासारखा कवी तयार झाल्याचे समाधान व्यक्त केले.