शिवसेनेच्या 'अच्छे दिन'चे पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:14 PM2019-04-17T16:14:45+5:302019-04-17T16:15:35+5:30

भाजपवर टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युती होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं राहण्याचे सांगत आहेत.महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर भाजप विरोधात थेट रस्तावर उतरणारी शिवसेना आता सोशल मिडियावर आपल्या जुन्या पोस्ट आणि आंदोलनामुळे ट्रोल होत आहे. 

lok sabha election 2019 Shivsena's poster Viral on social media | शिवसेनेच्या 'अच्छे दिन'चे पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल

शिवसेनेच्या 'अच्छे दिन'चे पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीतशिवसेना-भाजप युती झाली असली तरीही मागील चार वर्षांत एकमेकांवर केलेल्या आरोपाच्या पोस्ट आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना थेट रस्तावर येऊन आंदोलन करत होती. त्यावेळी भाजपच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या पोस्ट विरोधकांकडून सोशल मिडियावर वायरल करण्यात येत आहे.

भाजप सरकारच्या काळात प्रचंड महागाई झाल्याचे आरोप शिवसेनेकडून निवडणुकीपूर्वी करण्यात येते होते. राज्यातील अनेक जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी शिवसेनेने हेच का 'अच्छे दिन' अशी पोस्टरबाजी केली होती. यामध्ये भाजप सरकार आल्यापासून पेट्रोल, डिझेलची दरवाढ व सरकार येण्यापूर्वीचे भाव यातील फरक दाखवणारे होर्डिग शहारत लावण्यात आले होते.

आता मात्र भाजप वर टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युती होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं राहण्याचे सांगत आहेत.महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर भाजप विरोधात थेट रस्तावर उतरणारी शिवसेना आता सोशल मिडियावर आपल्या जुन्या पोस्ट आणि आंदोलनामुळे ट्रोल होत आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात उद्या १० ठिकाणी मतदान होणार आहे. निवडणुक आयोगाच्या नियमानुसार  उमेदवारांनी प्रत्यक्षात जरी प्रचार बंद केला असली तरीही सोशल मिडियावर होणारा प्रचार मात्र सुरूच आहे.

Web Title: lok sabha election 2019 Shivsena's poster Viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.