पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:28 AM2024-05-11T11:28:52+5:302024-05-11T11:29:24+5:30

Loksabha Election - पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांच्या जाहीरसभेत राज ठाकरेंनी महायुतीला मतदान करण्याचं आवाहन हिंदू समाजाला केले. त्यानंतर संजय राऊतांनी आक्रमकपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला. 

Lok Sabha Election - Sanjay Raut criticizes BJP along with Raj Thackeray | पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."

पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."

नाशिक - Sanjay Raut on Raj Thackeray ( Marathi News ) काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशि‍दीतून फतवे काढले जातायेत असा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत करत महायुतीच्या लोकांना हिंदूंनी मतदान करावं असं आवाहन केले. त्यावरून आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे हे महाराष्ट्रद्रोही लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसलेत असा घणाघात त्यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काही नेते आणि काही पक्ष यांचा फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातील स्थिती नाही. महाराष्ट्रात आणि देशात सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. त्याचवेळी राज ठाकरेंसारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील त्याची कल्पना न केलेली बरी असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत अमित शाह, नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवून देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. मराठी माणसाचे शत्रू आहेत हे सांगणारे हे सद्गृहस्थ आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात याबद्दल ईडीचे आभार असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना जामीन देताना सर्वोच्च न्यायलयाने ईडी आणि सरकारला फटकारले. केजरीवाल यांची अटक ही राजकीय सुडबुद्धीची होती. केजरीवालांना अंतरिम जामीन मिळाल्यापासून ते आता प्रचारात सहभागी होतील. अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचा आम्हाला आनंद आहे. काल रात्री उद्धव ठाकरे यांचं अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केले, अभिनंदन केले आणि माझेही त्यांच्याशी बोलणं झालं. १७ तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीची सांगता सभा आहे. त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित केले आहे. ते आमंत्रण स्वीकारलं आहे. १७ तारखेला नरेंद्र मोदीही मुंबईत आहेत आणि त्या दिवशी केजरीवालही मुंबईत येतील अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 
 

Web Title: Lok Sabha Election - Sanjay Raut criticizes BJP along with Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.