महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; लोकमतच्या दोन पत्रकारांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 04:23 PM2018-10-10T16:23:56+5:302018-10-10T18:13:54+5:30

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

maharashtra government announced journalism awards three lokmat journalist will be felicitated | महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; लोकमतच्या दोन पत्रकारांचा गौरव

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; लोकमतच्या दोन पत्रकारांचा गौरव

Next

मुंबई: महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. विजय फणशीकर आणि रमेश पतंगे यांना अनुक्रमे 2016 आणि 2017 साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरुप आहे. तर 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असं इतर सर्व पुरस्कारांचं स्वरुप आहे. लोकमतच्या दोन पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी गौरवण्यात येणार आहे. 

राज्य शासनाच्यावतीनं विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 2017 साठीचा आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग) लोकमतचे वरिष्ठ प्रतिनिधी जमीर काझी यांना जाहीर झाला आहे. तर याच वर्षासाठीचा तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तरीय) लोकमतचे छायाचित्रकार दत्तात्रय खेडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. 

विकास वार्तांकनासाठी 2016 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा रत्नागिरीचे राजेश जोष्ठे (दै. पुढारी) यांना तर 2017 साठीचा हा पुरस्कार लुमाकांत नलावडे (दै. सकाळ, कोल्हापूर) यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

2016 व 2017 च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत 2016 साठी पत्रकार राजीव कुलकर्णी, प्रवीण मुळ्ये, पांडुरंग मस्के, राजकुमार सिंग, निलेश खरे, रमाकांत दाणी, राहुल पांडे, बबन वाळके, नितीन तोटेवार यांचा तर  2017 च्या निवड समितीत पत्रकार विजय सिंह, क्लॅरा लुईस, सिद्धेश्वर डुकरे, उमेश कुमावत, भालचंद्र पिंपळवाडकर, शैलेंद्र तनपुरे, सत्यजित जोशी, विलास तोकले, कृष्णा शेवडीकर यांचा समावेश होता.

राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या विविध पुरस्कारांची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली ते पुरस्कार खालीलप्रमाणे- 
वर्ष-2016 –
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) राजेश जोष्ठे, दै. पुढारी, रत्नागिरी.
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै. भास्कर, मुंबई
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, दै. गोदावरी ऑब्झर्वर, नांदेड
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) - वर्षा फडके-आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) कपिल श्यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर) प्रज्ञेश कांबळी, छायाचित्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) प्रफुल्ल सुतार, ई - सकाळ, कोल्हापूर
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै. तरूण भारत, सातारा.
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर- (51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग -मारूती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग - ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे
शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - माधव डोळे, ब्युरोचीफ, दै. सामना, ठाणे
ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदूर्ग
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर

वर्ष-2017 -
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) -लुमाकांत नलावडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर) - राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) - खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा. व ज.) (राज्यस्तर) डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी , नाशिक
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - कन्हैय्या खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर) - मनीष झिमटे, छायाचित्रकार, अमरावती
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) - संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्य मराठी , धुळे - 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) - जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै. पुढारी औरंगाबाद
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग - प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर
शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - जान्हवी पाटील, वार्ताहर, दै. तरूण भारत, रत्नागिरी
ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - अभिजीत डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग- अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला
ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स ,गोंदिया
 

Web Title: maharashtra government announced journalism awards three lokmat journalist will be felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.