सीबीएसई आणि आयसीएसईला टक्कर देण्यासाठी आता महाराष्ट्राचे 'इंटरनॅशनल बोर्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 11:04 AM2018-05-04T11:04:29+5:302018-05-04T11:04:32+5:30
एमआयईबीचा अभ्यासक्रम हा साधारण सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण मंडळांसारखाच असेल.
मुंबई: देशातील आयसीएसई व सीबीएसई या शिक्षण मंडळांच्या धर्तीवर आता राज्य सरकारकडूनही स्वतंत्र शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ ( एमआयईबी) असे या बोर्डाचे नाव असेल. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. एमआयईबीचा अभ्यासक्रम हा साधारण सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण मंडळांसारखाच असेल. जेणेकरून एमआयईबीला जागतिक पातळीवर स्वत:चे स्थान निर्माण करता येईल, असे तावडे यांनी सांगितले.
Maharashtra International Education Board (MIEB) will be started by Maharashtra govt this year. MIEB will form the curriculum in same respect as it is formed in ICSE & CBSE. We'll take students from local to global & known to unknown: Vinod Tawde, Maharashtra Education Minister pic.twitter.com/CjvDHd2FMo
— ANI (@ANI) May 4, 2018