महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणा-या दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 06:14 AM2017-09-19T06:14:14+5:302017-09-19T06:16:32+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाते. मंडळाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाते. मंडळाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येईल. हे वेळापत्रकच अंतिम असेल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरला सुरू झाली होती. यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून ठेवावी, असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले होते.
दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्जामध्ये या वर्षी काही बदल करण्यात आले होते. या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला होता. हा अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही, तसेच वेळेत काम पूर्ण होईल, यासाठी आधीच माहिती संकलित करणे आवश्यक होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाचे अचूक स्पेलिंग, जन्मदिनांक, आईचे नाव, जन्मस्थळ, विद्यार्थ्यांनी परीक्षेला घ्यायचे विषय व माध्यम, विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक, विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व सही स्कॅन करून ठेवणे, तसेच अर्ज भरताना विद्यार्थी कला, चित्रकला, लोककला व क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठी अर्ज करणार आहे किंवा नाही, याबाबत उल्लेख करणे, या सर्व बाबींचे माहिती संकलित करणे आवश्यक आहे, असे आवाहन पाटील यांनी केले होते.