महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे पुरस्कार जाहीर

By admin | Published: May 8, 2017 06:43 PM2017-05-08T18:43:32+5:302017-05-08T19:48:26+5:30

मग्न तळ्याकाठी या नाटकासाठी रुपये 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली

The Maharashtra State Marathi Professional Drama Competition Awards | महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे पुरस्कार जाहीर

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - 29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या मग्न तळ्याकाठी या नाटकासाठी रुपये 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अनेकांनी पुरस्कार पटकावले आहेत.

रसिका प्रॉडक्शन्सच्या अनामिका संस्थेच्या कोड मंत्र या नाटकास रु. 4 लाख 50 हजाराचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तसेच सुबक, मुंबई या संस्थेच्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकास रु. 3 लाखांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या पुरस्कारांनी दिग्दर्शकांनाही सन्मानित करण्यात आलं आहे. मग्न तळ्याकाठी या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना (रु.1,50,000/-) प्रथम पारितोषिक देण्यात आलं आहे. तर कोडमंत्र या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी  राजेश जोशी यांना (रु.1,00,000/-) द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तर  अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनाही (रु.50,000/-) रोख पुरस्कार प्राप्त झाला आहे. मनस्विनी लता रविंद्र यांनी लेखन केलेल्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकाला (रु.1,00,000/-) प्रथम पारितोषिक मिळालं आहे. तर मग्न तळ्यासाठी या नाटकाच्या लेखनासाठी महेश एलकुंचवार यांना (रु.60,000/-) द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. तसेच विजय निकम लिखित कोडमंत्र या नाटकाला (रु.40,000/-) तृतीय पारितोषिक मिळालं आहे. 
तसेच 2 ते 6 मे 2017 या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 10 व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आशालता वाबगांवकर, श्रीनिवास भणगे, चंद्रकांत मेहेंदळे,  अजित सातभाई आणि सुनील देवळेकर यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

इतर पुरस्कार
प्रकाश योजना: प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) रवि रसिक (नाटक-मग्न तळयाकाठी), द्वितीय पारितोषिक(रु.30,000/-) भोतेश व्यास, (नाटक-कोडमंत्र), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) योगेश केळकर (नाटक-किमयागार)
 
नेपथ्य: प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)प्रसाद वालावलकर (नाटक-कोड मंत्र), द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) प्रदिप मुळये(नाटक-मग्न तळयाकाठी), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) प्रदिप मुळये (नाटक-अमरफोटो स्टुडिओ)
 
संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक(रु.40,000/-) आनंद मोडक व राहुल रानडे(नाटक-मग्न तळयाकाठी) द्वितीय पारितोषिक(रु.30,000/-) सचिन जिगर (नाटक-कोडमंत्र) तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) राहुलरानडे (नाटक-बंध-मुक्त)
 
वेशभूषा : प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव (नाटक-मग्नतळयाकाठी) द्वितीय पारितोषिक(रु.30,000/-) कल्याणी कुलकर्णी-गुगले(नाटक-अमर फोटो स्टुडिओ) तृतीयपारितोषिक (रु.20,000/-) अजय खत्री(नाटक-कोड मंत्र)
 
रंगभूषा : प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)अभय मोहिते (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) शरदसावंत (नाटक-मग्न तळयाकाठी)
तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) संतोषपेडणेकर व हेमंत कदम (नाटक-कोड मंत्र)
 
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.50,000/-
पुरुष कलाकार : चिन्मय मांडलेकर (नाटक-मग्न तळयाकाठी), अमेय वाघ (नाटक-अमरफोटो स्टुडिओ), वैभव मांगले (नाटक-मग्नतळयाकाठी), सुव्रत जोशी (नाटक-अमर फोटो स्टुडिओ), प्रशांत दामले (नाटक-साखर खाल्लेला माणूस)
स्त्री कलाकार : मुक्ता बर्वे (नाटक-कोड मंत्र),निवेदिता सराफ (नाटक-मग्न तळयाकाठी),लिना भागवत (नाटक-के दिल अभी भरानही), हेमांगी कवी (नाटक-ती फुलराणी), इलाभाटे (नाटक-यू टर्न-2)

Web Title: The Maharashtra State Marathi Professional Drama Competition Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.