पशुबळीविरोधात कायदा करा, मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:32 AM2017-09-20T00:32:27+5:302017-09-20T00:32:29+5:30

नवरात्र महोत्सवात पशुबळी न देण्याचा नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राज्यभरातील देवी-देवतांच्या उत्सवात होणारी पशुहत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कायदा करावा, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

Make laws against animal husbandry, founder president of Mangal Pratishthan; Kalyan Gangwal's demand | पशुबळीविरोधात कायदा करा, मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी

पशुबळीविरोधात कायदा करा, मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी

Next

पुणे : नवरात्र महोत्सवात पशुबळी न देण्याचा नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राज्यभरातील देवी-देवतांच्या उत्सवात होणारी पशुहत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कायदा करावा, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. देवीसमोर पशुबळी देणे ही अंधश्रद्धा असून, त्यामुळे अनारोग्य, अस्वच्छता आणि दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे देवीभक्तांनी अशा अनिष्ट रूढींना फाटा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. गंगवाल म्हणाले, ‘नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवात खंडेनवमीच्या दिवशी 'अजबली' देण्याची प्रथा आहे. मात्र, ही प्रथा अत्यंत चुकीची असून, याविरोधात सर्व जीव मंगल प्रतिष्ठान कायदा व प्रबोधन यामार्फत गेली २१ वर्षे लढा देत आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीसमोर अजबळी देण्याची प्रथा आहे.
या प्रथेला कोणतेही धार्मिक अधिष्ठान नाही. ही अतिशय
अमानुष पद्धतीने भौतिक-कौटुंबिक मानसिक गरज भागविण्यासाठी केलेल्या नवसपूर्तीच्या नावाखाली हजारो बोकडांचा बळी दिला जातो. परिसरात पडलेल्या मांसामुळे, रक्तामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, अनारोग्य निर्माण होते.
>देवाची आणि नवस पूर्ण करण्याची भीती नागरिकांच्या मनात असल्याने कर्ज काढून अशा प्रथा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची पिळवणूक होते. राज्यभरातील विविध गावांतील छोट्या-मोठ्या देवस्थांनामध्ये दिले जाणारे हे बळी रोखण्यासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलन व पर्यावरण संवर्धनासाठी कायदा करावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे. - डॉ. कल्याण गंगवाल

Web Title: Make laws against animal husbandry, founder president of Mangal Pratishthan; Kalyan Gangwal's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.