धक्कादायक ! नाचताना झालेल्या वादातून दोन दारूड्यांनी केली एकाचा हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 07:21 PM2017-09-16T19:21:59+5:302017-09-16T19:22:12+5:30
दारू पिऊन नाचत असताना झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रेमचंद गजरे (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
कल्याण, दि. 16- दारू पिऊन नाचत असताना झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रेमचंद गजरे (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्य तीन जण फरार आहेत. याप्रकरणी अक्षय आरोलकर (वय 22) आणि भावेश पाटीलला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अन्य ३ साथीदारांचा शोध सुरू आहे. यासंदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.डी.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री मृच गजरे हा त्याचा मित्र गौरव भोसलेसमवेत एका बारमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी दारु पिऊन नाचत असताना दुस-या ग्रुपमधील मद्यपिंना धक्का लागला. त्यात ग्लासमधील दारू सांडली, या रागातून वादावादी झाली. ते भांडण बारचालक- कर्मचा-याने सोडवले. त्यानंतर बराच वेळ गेला, पण तरीही त्याचा राग धरुन बारमधून बाहेर आल्यावर पाच जणांनी गजरे आणि भोसलेला पुन्हा मारहाण केली. यावेळी त्यांच्यावर चाकूनं वार करण्यात आल्याने गजरे व भोसले जखमी झाले. या हल्यात गंभीर जखमी झालेला गजरेला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गजरे याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असून तो बांधकाम व्यावसायिक होता. हाणामारी-चाकू हल्ला झाल्याची घटना जरी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली नसली तरीही बारमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या फुटेजवरुन अन्य तिघांचा शोध सुरु करण्यात आला आहे.