राज्यातील ११ शहरांत होणार आंबा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:29 AM2019-04-13T06:29:23+5:302019-04-13T06:29:25+5:30
पणन मंडळाचा उपक्रम : ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी प्रयत्नशील
रत्नागिरी : ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी पणन मंडळातर्फे दरवर्षी राज्यातील विविध शहरामध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आंबा प्राप्त होतोच, शिवाय हमाली, दलालीची कटकट न राहता शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसेही मिळतात. पणन मंडळाने यावर्षीही राज्यातील अकरा मोठ्या शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
यंदा रत्नागिरीतील १२५ आंबा उत्पादकांनी पणनकडे स्टॉलची मागणी केली असून, यातील ६० शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. पणन मंडळाने राज्यातील ११ प्रमुख शहरांमध्ये थेट विक्री स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. ‘उत्पादक ते ग्राहक’ अशी साखळी निर्माण करण्यासाठी थेट विक्रीचा हा उपाय शेतकºयांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
विक्रेत्यांना सुविधा पुरविणार
पुणे, नाशिक, कोथरूड, इंदोर, पनवेल, भिवंडी, वसई, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, कल्याण येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्रींतर्गत शेतकºयांना संधी प्राप्त होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. पर्यटकांना खात्रीशीर व दर्जेदार आंबा मिळावा, यासाठी बाजार समितीच्या मदतीने आंबा उत्पादकांना स्टॉल्स दिले जाणार आहेत. शेतकºयाच्या शेतमाल विक्रीकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देण्याबरोबरच थेट ग्राहकांना विक्रीबाबतच्या आवश्यक सुविधा उभारण्यावर पणन मंडळाने भर दिला आहे. आंबा विक्रीकरिता पुणे, मुंबई शिवाय राज्यातील अन्य शहरांमध्ये, तसेच परराज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळ प्रयत्नशील आहे.