इफेड्रीन तस्करी प्रकरणी मनोज जैनला पोलीस कोठडी
By admin | Published: August 3, 2016 05:27 AM2016-08-03T05:27:08+5:302016-08-03T05:27:08+5:30
इफेड्रीन प्रकरणातील आरोपी मनोज जैन यास येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी चार दिवसांची (६ आॅगस्टपर्यंत) पोलीस कोठडी दिली.
सोलापूर/ठाणे : देशभर गाजत असलेल्या इफेड्रीन प्रकरणातील आरोपी मनोज जैन यास येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी चार दिवसांची (६ आॅगस्टपर्यंत) पोलीस कोठडी दिली. सोलापुरातील एव्हॉन कंपनीत विनापरवाना डीएल इफेड्रीन बेसचे उत्पादन व विक्री केल्याच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या जैनला, मंगळवारी पहाटेसोलापूरच्या विशेष पथकाने अटक केली.
आरोपी हा एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. मधील संचालक आहे़ या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी सोमवारी ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहातून ताबा घेऊन, त्याला मंगळवारी सोलापूरच्या सत्र न्यायालयात उभे केले. पोलिसांनी ७ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी जैन यास ६ आॅगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)
>तीन महिन्यांपूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण युनिटने अटक केलेल्या ओकाया सिपरसचिनाता (३२) या नायजेरियनकडून हस्तगत केलेल्या एमडी पावडरमध्ये इफेड्रीन आणि मेथ एप्टामाइन (एमडी अर्थात पार्टी ड्रग) आढळल्याची माहिती ठाण्यातील सूत्रांनी दिली.