मान्सून मालदीव बेटावर, ४८ तासांत मान्सून दक्षिण केरळ, तामिळनाडू व बंगाल उपसागरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:08 AM2018-05-28T05:08:21+5:302018-05-28T05:08:21+5:30
नैऋत्य मोसमी पावसाचे रविवारी अरबी समुद्राच्या कोमारीन भाग, मालदीव बेट, बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान, निकोबार बेट, अंदमान समुद्रात आगमन झाले आहे.
पुणे - नैऋत्य मोसमी पावसाचे रविवारी अरबी समुद्राच्या कोमारीन भाग, मालदीव बेट, बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान, निकोबार बेट, अंदमान समुद्रात आगमन झाले आहे.
४८ तासांत मान्सून दक्षिण केरळ, तामिळनाडु व बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल हवामान असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़
२४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २९ मे ला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल़
३० व ३१ मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
आहे़
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान
(अंश सेल्सिअस)
पुणे ३९़६, लोहगाव ४०़५,जळगाव ४४़२, कोल्हापूर ३६़३, महाबळेश्वर ३१़७, मालेगाव ४४़२, नाशिक ४०़३, सांगली ३५़४, सातारा ३६़७, सोलापूर ४०़१, मुंबई ३४, अलिबाग ३३़९, रत्नागिरी ३४़२, पणजी ३२़५, डहाणू ३६़१, उस्मानाबाद ३९़५, औरंगाबाद ४१़४, परभणी ३४़३, अकोला ४५, अमरावती ४३़८, बुलडाणा ४१़५, ब्रम्हपुरी ४२़३, चंद्रपूर ४२़४, गोंदिया ४०़५, नागपूर ३८़८, वर्धा ४१़५, यवतमाळ ४२़
पावसाळ््यातील पर्जन्याच्या दिवसांत घट
च्पावसाळ््यातील चार महिन्यांच्या काळात होणाऱ्या पर्जन्याच्या दिवसांत घट होत आहे. सरासरीएवढा पाऊस पडत असला तरी पावसाचे दिवस कमी होत आहेत, असे १०० वर्षांतील पावसाचा अभ्यास केल्यानंतर निदर्शनास आले आहेत. विशेष म्हणजे या स्थितीचा शेतीवर परिणाम होऊ लागला आहे़
च्पावसाळ््यातील चार महिन्यांत पाऊस विभागून व्हावा, अशी अपेक्षा असते़ परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये दोन अथवा तीन महिन्यांत होणारा पाऊस सरासरी गाठतो. कोरड्या दिवसांच्या संख्येत वाढ होत आहे़ जूनमध्ये लातूरला कमी पाऊस झाला आहे़ त्याचवेळी पुणे जिल्ह्यात त्याचे प्रमाण वाढले आहे़ सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच नाशिक जिल्ह्यातही जूनमध्ये पाऊस वाढला आहे़
च्जुलै महिन्यात जालना, लातूर, वर्धा, भंडारा तेथील पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे़ उस्मानाबाद, चंद्रपूरलाही पाऊस कमी झाला आहे़ त्याचवेळी सातारा, कोल्हापूर, मुंबईत जुलै महिन्यातील पावसाचे प्रमाण वाढले आहे़
च्आॅगस्टमध्ये संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होत असल्याचे व त्यात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे़ सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, जळगाव, अमरावती, बुलडाणा, अकोला येथील पावसाच्या प्रमाणात ९९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे़ पुणे, रत्नागिरी, ठाणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांत पाऊस वाढला आहे़
च्सप्टेंबरमध्ये गडचिरोली, यवतमाळ वर्धा, नांदेड, बीड, परभणी येथील पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे़ त्याचवेळी पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पावसात वाढ झाली आहे़ मान्सूनच्या चार महिन्यांतील पावसाचा विचार केल्यास भंडारा, उस्मानाबाद, लातूर तसेच वर्धा येथील पावसात घट झाली आहे़ त्याचेळी पुणे, नाशिक, रायगड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण वाढले आहे़
च्जूनमध्ये एका जिल्ह्यात, जुलैमध्ये ६ जिल्ह्यांत आणि सप्टेंबरमध्ये ६ जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते़ पाऊस पडण्याचा काळ आणि वेळ यात बदल झाला असून त्याचा परिणाम शेती आणि शेती उत्पादनावर झाला आहे़
गेल्या काही वर्षांत चार महिन्यांत पडणारा पाऊस हा २ ते ३ महिन्यांतच पडू लागला आहे. कोरड्या दिवसांमध्ये वाढ झाली असल्याचे अभ्यासावरून दिसून येते.
- डॉ़ पी़ गुहाठाकुर्ता, अभ्यासक
१९०१ ते २००६ मध्ये दर महिन्याला पडलेल्या पावसाचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील ३३५ पर्जन्य मापक केंद्रातील माहितीचा उपयोग करण्यात आला आहे.
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ ईशान्य भारतात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे़