मुंबई-दिघी-दाभोळ सागरी प्रवासी वाहतूक सुरू, भाऊचा धक्का ते दिघी साडेचार तासांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:10 AM2017-10-19T05:10:38+5:302017-10-19T05:10:47+5:30
मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून
अलिबाग : मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून, कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. बुधवारी दिघीपर्यंत आलेली ही बोट गुरुवारी भाऊचा धक्का (मुंबई) - दिघी(रायगड) आणि पुढे रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळपर्यंत प्रवासी सेवा देणार असून, परतीचा प्रवासदेखील दाभोळ-दिघी-भाऊचा धक्का असा असेल, अशी माहिती मेरिटाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
मेरिटाइम बोर्डाने डेल्टा मेरिटाइम अँड इंडस्ट्रियल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांना एमव्ही रावी आणि एमव्ही शिवम या दोन बोटी आणि विंध्यवासिनी मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या एमव्ही केपीएस या बोटीला मुंबई ते दिघी, दिघी ते दाभोळ आणि दाभोळहून दिघीमार्गे मुंबई या मार्गावर चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. या बोटसेवेचे वेळापत्रक बोर्डाच्या ँ३३स्र२://ेंँेंु.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइटवर देण्यात आले आहे. मुंबई ते दिघी या प्रवासासाठी प्रति प्रवासी ३३० रु. आणि मुंबई ते दाभोळसाठी प्रति प्रवासी ६६० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्वकल्पना नसल्याने पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. बुधवारी दोन प्रवाशांनी धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) या सागरी प्रवासी सेवेचा लाभ घेतला. गुरुवारपासून प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी माहिती दिघी बंदराचे अधीक्षक अरविंद सोनावणे यांनी दिली.
बुधवारी केपीएएस ही बोट सकाळी ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दुपारी दीड वाजता दिघीला पोहोचली.
बोट फेºयांचे वेळापत्रक
गुरु वार १९ आॅक्टोबर रोजी शिवम ही बोट स. ८ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. १२.३० वाजता दिघीला पोहोचेल. रावी ही बोट स. ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. दीड वाजता दिघीला पोहोचेल, तर दिघीहून दु. २.३० वाजता निघून सायंकाळी ७ वाजता मुंबईला पोहोचेल. केपीएस ही बोट स. साडेदहा वाजता भाऊचा धक्काहून निघून दु. ३ वाजता दिघीला पोहोचेल, तर दु. ४ वा. दिघीहून निघून रा. ८.३० वा. मुंबईला पोहोचेल.
शुक्र वारी २० आॅक्टोबर रोजी एमव्ही रावी बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ८ ते दु. १२.३० व दिघी-मुंबईसाठी दु. १.३० ते सायं. ६, केपीएस बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ९.३० ते दु. २ व दिघी-मुंबईसाठी दु. ३ ते सायं. ७.३० असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.